महाराष्ट्र गणरायाच्या (Ganeshotsav 2025) आगमनसाठी सज्ज झाला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि मंडळांमध्ये विराजमान होईल. मात्र, मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यातला प्रत्येक रविवार गणेशभक्तांसाठी खास ठरणार आहे. दर रविवारी विविध मंडळांचे गणराया मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. याची सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट 2025 रोजी परळच्या महाराजा, चंदनवाडीचा गोड गणपती, मुंबईचा गजमुखंम यांसह विविध मंडळांच्या बाप्पांच जल्लोषात आगमन झालं. यावेळी हजारोंच्या संख्येने गणेशभक्त लालबाग-परळमध्ये हजर झाले होते. गणरायाल्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती. अशाच काही गणपतींच देखणं रूप आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलय ते सलोनी मोरे यांनी.