आपल्या ग्रामपंचायतीला (Gram Panchayat Fund Details) किती निधी मिळाला आणि तो कुठे खर्च झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार गावतल्या प्रत्येक नागिरकाला असतो. परंतु बऱ्याच जणांना त्याची माहिती कुठे मिळते हे माहित नसतं. महाराष्ट्रातल्या सर्वच ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजनांतर्गत निधी मिळतो. तसेच ज्या ज्या नवीन योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जातात त्याचा निधी सुद्धा ग्रामपंचायतीला दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने 15 वा वित्त आयोग निधी, मनरेगा, स्वच्छ भार मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना अशा काही महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. परंतु बऱ्याच वेळा हा निधी ग्रामपंचायतीकडून योग्य प्रकारे खर्च केला जात नाही. अशा वेळी गावाचा नागरिक म्हणून तुम्हाला याची माहिती ऑनलाईन पाहता येते. नागरिक म्हणून गावाला मिळणारा निधी पादर्शकपणे खर्च होत आहे का, हे जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ही सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.
ग्रामपंचायतीला मिळणारा निधी ऑनलाईन कसा चेक करायचा, चला सोप्या शब्दांत समजून घेऊ
1. ग्रामपंचायतीचा निधी तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
eGramSwaraj पोर्टल (https://egramswaraj.gov.in/)
- हे पंचायती राज मंत्रालयाचे अधिकृत पोर्टल आहे.
- येथे देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक, मंजूर प्रकल्प, खर्चाचा तपशील पाहता येतो.
- लॉगिन न करता थेट आपल्या राज्य → जिल्हा → तालुका → ग्रामपंचायत असे निवडून माहिती मिळते.
PFMS पोर्टल (https://pfms.nic.in/)
- Public Financial Management System (PFMS) वर केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीची माहिती असते.
- येथे “Scheme-wise Funds Transfer” किंवा “Know Your Payments” या पर्यायांवर जाऊन निधीची तपशीलवार माहिती मिळते.
राज्य सरकारची ग्रामपंचायत विभागाची वेबसाईट
- महाराष्ट्रात https://maharashtra.gov.in किंवा gramvikas.maharashtra.gov.in या पोर्टलवर ग्रामपंचायतीसंबंधी विविध माहिती उपलब्ध असते.
- काही जिल्ह्यांनी स्वतंत्र Zilla Parishad portals तयार केलेले आहेत, जिथे पंचायत स्तरावरील निधीची माहिती असते.
2. तपासण्याची पद्धत
- सर्वप्रथम eGramSwaraj.gov.in ला भेट द्या.
- “Reports” पर्यायावर क्लिक करा.
- आपल्या राज्याचे नाव → जिल्हा → तालुका → ग्रामपंचायत निवडा.
- येथे Approved Activities, Finance & Accounting Reports, Planning Reports हे पर्याय दिसतील.
- त्यावर क्लिक करून तुम्हाला मिळालेला निधी, मंजूर कामे आणि प्रत्यक्ष खर्चाची माहिती मिळते.
3. या माहितीचा फायदा
- नागरिकांना ग्रामपंचायतीत किती निधी आला आहे आणि कुठे खर्च झाला आहे हे स्पष्टपणे कळते.
- भ्रष्टाचार व अपव्यय थांबवण्यास मदत होते.
- ग्रामसभा बैठकीत प्रश्न विचारण्यासाठी ठोस पुरावे मिळतात.
थोडक्यात सांगायचे तर, ग्रामपंचायतीचा निधी तपासणे आज अगदी सोपे झाले आहे. eGramSwaraj आणि PFMS पोर्टल वापरून प्रत्येक नागरिक आपल्या गावाच्या विकास कामांवर लक्ष ठेवू शकतो. चला तर म वेळ न दवडता आपला हक्क बजावा.