नोव्हेंबर महिना सुरू झाला असून आता सर्वांना नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने पुढील वर्षाच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (Holidays in 2026) प्रसिद्ध केले आहे. या कॅलेंडरनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या 9 सुट्ट्या कमी झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये एकूण 50 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये 31 सार्वजनिक सुट्ट्या आणि 19 एच्छिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
2026 मधील महत्त्वाच्या सुट्ट्यांची यादी
जानेवारी – मकर संक्रांती (14), प्रजासत्ताक दिन (26)
फेब्रुवारी – महाशिवरात्री (15), छत्रपती शिवजी महाराज जयंती (19)
मार्च – होळी (4), हिंदू नववर्ष गुढीपाडवा (19), प्रभु श्री राम नवमी (26), महावीर जयंती (31)
एप्रिल – गुड फ्रायडे (3), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14)
मे – बुद्ध पौर्णिमा (1), बकरी ईद (27)
जून – मोहरम (26)
ऑगस्ट – स्वातंत्य दिन (15), ईद ए मिलाद उन नबी (26), रक्षाबंधन (28)
सप्टेंबर – जन्माष्टमी (4), गणेश चतुर्थी (14)
ऑक्टोबर – गांधी जंयती (2), दसरा (20)
नोव्हेंबर – दिवाळी (8), गोवर्धन पूजा (9), भाऊबीज (11), छठ पूजा (15), गुरू नानक जयंती (24)
डिसेंबर – ख्रिसमस (25)
पुढच्या वर्षीचं संपूर्ण कॅलेंडर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Calendar 2026