लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi

श्रीमंत असो अथवा गरिब सर्वांचाच रेल्वेशी कधीनाकधी संबंध आलेलाच असतो. रेल्वे म्हंटल की जलद, सुरक्षित आणि सर्वात महत्वाच म्हणजे खिशाला परवडणारा प्रवाास. लांबचा पल्ला कमी वेळात पुर्ण करायचा असेल तर रेल्वेने प्रवास करण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. मुंबई सारख्या शहरामध्ये रेल्वेशिवाय सामान्य माणसाचं पान हलत नाही. भारतामध्ये 18 एप्रिल, 1853 रोजी पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर धावली ते आजतागायत रेल्वेने ब्रेक घेतलेला नाही. अविरत सेवा रेल्वेच्या माध्यमातून दिली जातं आहे. सरासरी, एका सामान्य ट्रेनमधून 10,000 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात, म्हणजेच 10,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याची जबाबदारी एका लोको पायलटवर ( How To Become a Loco Pilot information in Marathi) असते.

लोको पायलटची जबाबादारी विमान चालवणाऱ्या पायलट इतकीच महत्वाची असते. रेल्वेने प्रवास करताना तुमच्याही मनात कधीतरी विचार आला असेल ‘लोको पायलट’ कसे व्हायचे (How To Become Loco Pilot). लोको पायलट विषयी संपुर्ण माहिती या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे.

लोको पायलट विषयी थोडक्यात (Loco Pilot Information in Marathi)

देशातील रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट हे एक सामान्य पद आहे. लोको पायलट सरकारी नोकरी असल्यामुळे चांगला पगार आणि अतिरिक्त फायद्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो. लोको पायलट म्हणजे रेल्वे चालवण्यासाठी आणि ट्रांझिट दरम्यानचे रेल्वेचे प्रभावी निरक्षण करण्यासाठी महत्वाची व्यक्ती असते. भारतीय रेल्वेमध्ये हे एक वरिष्ठ पद आहे. भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक लोको पायलट्सची भरती करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते, त्यानंतर लोको पायलट या पदावर किंवा इतर पदांवर पदोन्नती दिली जाते. कोणत्याही अर्जदाराला थेट लोको पायलट म्हणुन जबाबदारी दिली जातं नाही.

लोको पायलट कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडतो? (What are the responsibilities of a loco pilot)

लोको पायलट जबाबदारीचे आणि महत्वाचे काम आहे. लोको पायलटवर हजारो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. लोको पालटच्या कामामध्ये सर्वात महत्वाचे काम म्हणजे ट्रेन चालवणे, अहवाल तयार करणे, देखभालीची काम करणे अशा काही महत्वपूर्ण कामांचा समावेश असतो.

रेल्वे चालवणे – लोको पायलट हा रेल्वे चालवण्यासाठी, रेल्वेचा वेग, टेक्निकल ऑपरेशन्स आणि इतर सर्व ऑपरेशन्ससाठी जबाबदार असतो. लोको पायलटची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे रेल्वे चालवणे आणि इंजिन रुळावरुन घसरु नये याची काळजी घेणे. यासाठी त्यांना विशिष्ट ट्रेनिंग दिले जाते.

रेल्वे संबंधित यंत्रसामग्रीची देखभाल करणे – कोणतीही गोष्ट सुरळीत चालण्यासाठी देखभाल हा महत्वाचा टप्पा आहे. या देखभालीत तपासणी, मुल्यमापन, विश्लेषण आणि काही गोष्टींमध्ये बदल करायचा असेत तर त्या गोष्टी बदलण्या सारख्या असंख्य कर्तव्यांचा समावेश असतो. रेल्वे रुळावरुन घसरु नये किंवा कोणताही यांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी इतर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहणे, अशी महत्वाची जबाबदारी लोको पायलटवर असते.

लोको पायलटचे काही महत्वाचे प्रकार (Types of Loco Pilots)

लोको पायलट होण्यासाठी लोको पायलटचे करिअर पर्याय तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. लोकोमोटिव्ह अभियंता, यार्डमास्टर आणि यांत्रिक अभियंता हे काही महत्वाचे करिअर पर्याय आहेत. या सर्व प्रकारांची थोडक्यात आपण माहिती घेऊ

लोकोमोटिव्ह अभियंता (Locomotive Engineer) : लोकोमोटिव्ह अभिंयत्यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी असते प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे लांबच्या पल्यावर घेऊन जाण्याची जबाबदारी लोकोमोटिव्ह अभियंत्यावर असते. रेल्वे सुरळीत आणि वेळेवर चालत आहे का नाही याची खात्री करण्यासाठी लोकोमोटिव्ह अभियंत्यांना मालवाहतूक, मार्ग आणि वेळापत्रक याची संपुर्ण माहिती असणे आवश्यक असते. काहीवेळा कामाचा ताण जास्त असेल तर, दिवस-रात्र काम करण्याची तयारी असली पाहिजे. बरेच लोकोमोटिव्ह अभियंते आठवड्यामध्ये चाळीस तासांपेक्षा जास्त काम करतात.

यार्डमास्टर (Yardmaster) : यार्डमास्टरलाच रेल्वेमार्ग ऑपरेटर सुद्धा म्हंटले जाते. यार्डमास्टरच्या काही प्राथमिक कर्तव्यांमध्ये रेल्वे स्विचिंगची कामे वेळेवर पुर्ण करण्याची महत्वाची जबाबदारी असते. सर्व मालवातूक करणाऱ्या गाड्या आणि रेल्वेगाड्या त्यांच्या इच्छित स्थळी वेळेवर पोहोचल्या आहेत का नाही, हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी यार्डमास्टरवर असते. रेल्वे, प्रवासी वातूक करणारी रेल्वे किंवा मालगाडी या गाड्यांना होणाऱ्या अडचणींबाबत यार्डमास्टरने जागरुक असले पाहिजे. आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी मार्गाचे नियोजन करता आले पाहिजे.

यांत्रिक अभियंता (Mechanical Engineer) : यांत्रिक अभियंता म्हणुन करिअर निवडताना तुम्हाला सर्व टेक्निकल जबाबदारी पार पाडावी लागते. यांत्रिक अभियंता म्हणुन तुम्हाला नवनवीन डिझाईन विकसीत कराव्या लागतात आणि त्या डिझाईन विकसीत करण्यासाठी संशोधनावर भर द्यावा लागतो. यांत्रिक अभियंता हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकास प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमध्ये सामील असतो. थोडक्यात यांत्रिक अभियंत्यावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा मशिनरी सिस्टमची निर्मीती आणि देखभाल करण्याची जबाबदारी असते.

लोको पायलटच्या कामाची शिफ्ट, कामाची जागा, कामाचे साप्ताहीक तास इ. याबद्दलची माहिती.

लोको पायलट म्हणजे भरपुर प्रवासाची नोकरी असचं म्हणावे लागेल. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना सुरळीत घेऊन जाण्याची जबाबदारी लोको पायलटची असते. प्रवाशांसोबत लोको पायलटचा सुद्धा नवनवीन ठिकाणी प्रवास होत असतो.

बरेच लोको पालयट आठवड्यातून किमान 40 तास किंवा त्यापेक्षा अधिक तास काम करतात. व्यस्त वेळापत्रकामुळे दोन शिफ्टमध्ये कामाची विभागणी केली जाते. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर ओव्हरटाईम करावा लागतो. आवश्यकतेनूसार अतिरिक्त तास काम करावे लागते.

लोको पायलट कसे व्हायचे (How To Become Loco Pilot)?

लोको पायलट या पदाविषयी तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे लोको पायलट होण्यासाठी कोणते निकष पुर्ण करावे लागतात. लोको पायलट होण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये इयत्ता 10वी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लोको पायलट होण्याचे स्वप्न आहे. असे विद्यार्थी भारतातील नामांकीत इंजिनीअरिंग महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांसारखे विविध प्रगत डिप्लोमा अभ्यासक्रम देखील करु शकतात. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्तेवर आधारीत प्रवेश परीक्षा घेतली जाते, तसेच काही इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जसे की BITSAT, JEE Main आणि JEE Advanced इ. तसेच विद्यार्थ्यांकडे ITI प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक आहे.

लोको पायलट होण्यााठी पात्रता (Eligibility to become a Loco Pilot)

 लोको पायलट होण्यासाठी उमेदवाराने प्रथम मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10+2 परिक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
 वरील अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उमेदवाराने पुढील पैकी कोणताही अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा जसे की, National Council For Vocational Training (NCVT) किंवा State Council For Vocational Training (SCVT) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेचा ITI अभ्यासक्रम
 लोको पायलट होण्यासाठी सर्वात महत्वाचा निकष म्हणजे, उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्षे असले पाहिजे.
 ज्या विद्यार्थ्यांचा समावेश राखीव प्रवर्गात केला जातो जसे की (SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक) या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट दिली जाते.

लोको पायलट होण्यासाठी प्रवेश परिक्षा (RRB ALP)

• कोणत्याही उमेदवाराला थेट लोको पायलट होता येत नाही.
• लोको पायलट होण्यापुर्वी उमेदवाराला रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) माध्यामातून घेण्यात येणारी असिस्टंट लोको पायलट (ALP) ही राष्ट्रीय स्तरीय स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
• RRB ALP ही परीक्षा संगणकावर आधारित (CBT), आणि अभियोग्यता चाचाणी (लागू असल्यास) आणि दस्तऐवज पडताळणी यांचा समावेश असतो. परीक्षा विवीध टप्प्यांमध्ये आयोजीत केली जाते.
• RRB ALP परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांने 10वी किंवा ITI अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा किंवा संबंधित डिप्लोमा केलेला असावा.

RRB ALP परीक्षेविषयी काही महत्वाच्या गोष्टी

रेल्वे भर्ती मंडळाची स्थापना 1942 मध्ये झाली. स्थापनेवेळी रेल्वे भरती मंडळाचे नाव रेल्वे सेवा आयोग असे ठेवण्यात आले होते. 1985 मध्ये रेल्वे सेवा आयोग हे नाव मागे पडले आणि आता रेल्वे सेवा आयोगाचे रुपांतर रेल्वे भरती मंडळामध्ये करण्यात आले.

RRB म्हणजे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (Railway Recruitment Board) आणि ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot). रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ही एक सरकारी संस्था असून, रेल्वे क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्याचे काम करते. रेल्वे भर्ती बोर्डाच्या माध्यामातून अनेक परीक्षा घेतल्या जातात. RRBच्या माध्यामातून RRB NTPC, RRB JE अशा काही परिक्षा घेतल्या जातात.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड झोन संपुर्ण देशभरात कार्यरत आहे. RRB च्या माध्यमातून सर्व 21 रेल्वे भरती मंडळांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. उमेदवार RRB ALP परीक्षा विविध भाषांमध्ये देऊ शकतो. जसे की मराठी, इंग्रजी, हिंदी, आसामी, कन्नड, तमिळ, मल्याळम, मणिपुरी, तेलगू, कोकणी आणि उर्दू.

1954 साली फक्त 4 विभागीय झोन कार्यरत होते. पण सध्या संपुर्ण देशात 21 RRB झोन कार्यरत आहेत. रेल्वे बोर्डाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

RRB ALP परीक्षा कधी आयोजीत केली जाते? (When is RRB ALP Exam Conducted)

RRB ALP परीक्षा दरवर्षी रेल्वे महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते. रेल्वे भर्ती बोर्डाच्या माध्यमातून असिस्टंट लोको पायलटसह इतर अनेक पदांसाठी भर्ती केली जाते. रेल्वे महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दरवर्षी जाहितरातीचे अपडेट रेल्वेच्या माध्यमातून उमेदवारांना दिले जातात.

RRB ALP परीक्षेला बसण्यासाठी पात्रता निकष काय आहेत? (What is the Eligibility Criteria to Appear for RRB ALP Exam)

• RRB ALP परीक्षेला पात्र होण्यासाठी उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्रासह मॅट्रीक उत्तीर्ण केलेली असावी.
• RRB ALP परीक्षेला पात्र होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
• RRB ALP परीक्षेला पात्र होण्यासाठी ज्या उमेदवारांकडे AICTE द्वारे मान्याताप्राप्त इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रोनिक्स, मेकॅनेकिल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पुर्ण केला असेल तर, असे उमेदवार सुद्धा RRB ALP परिक्षेसाठी पात्र आहेत.

RRB ALP परीक्षेसाठी निवड प्रक्रिया किती टप्प्यांमध्ये पार पडते?

RRB ALP परीक्षेसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडते. उमेदवाराने चार टप्पे यशस्वी केल्यानंतर त्याची संबंधित पदासाठी निवड केली जाते. या निवड प्रक्रियेत 2 संगणक आधारित चाचण्या घेतल्या जातात तसेच एक संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा पार पाडावी लागते.

1) RRB ALP परीक्षा पॅटर्न 2024 संगणक आधारित चाचणी (CBT-1)

a) गणित, सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे चार विषयांवर आधरित प्रश्न विचारले जातात.
b) गणित आणि सामान्य विज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात.
c) सामान्य बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुणांसाठी आणि चालू घडामोडी 10 प्रश्न 10 गुणांसाठी
d) एकूण 75 प्रश्न विचारले जातात 75 गुणांसाठी, 75 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनीटांचा कालावधी दिला जातो.

CBT 1 परीक्षेसाठी अभ्यासक्रम (Assistant Loco Pilot Syllabus)

A) गणित – अंकगणित, त्रिकोणमिती, संख्या मालिका, संभाव्यता, बीजगणित, गुणोत्तर आणि प्रमाण, वेग अंतर आणि वेळ, संख्या प्रणाली, नफा आणि तोटा, वेळ आणि काम, व्याज, टक्केवारी, सरासरी इ.

B) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – वर्गीकरण, कोडिंग-डिकोडिंग, वेन आकृती, वर्णमाला आणि शब्द चाचणी, दिशा आणि अंतर, ब्लड रिलेशन, मिसींग नंबर, ऑर्डर आणि रॅकिंग, अॅनालॉजी इ.

C) सामान्य विज्ञान – जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण

D) चालू घडामोडीं – राजकारण, अर्थव्यवस्था, पुरस्कार आणि सन्मान, कला आणि संस्कृती, खेळ

2) RRB ALP परीक्षा पॅटर्न 2024 संगणक आधारित चाचणी (CBT-2)

a) CBT-2 ही परिक्षा भाग अ आणि भाग ब अशा दोन पद्धतीने घेतली जाते.
b) ‘भाग अ’ मध्ये गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या विषयांचा समावेश असतो.
c) ‘भाग अ’ मध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनीटांचा कालावधी दिला जातो.
d) ‘भाग ब’ मध्ये संबंधित ट्रेडवर आधारित 75 गुणांसाठी 75 प्रश्न विचारले जातात. 75 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनीटाांचा कालावधी दिला जातो.
e) भाग अ आणि भाग ब मिळून एकूण 175 प्रश्न विचारले जातात आणि 175 प्रश्न सोडवण्यासाठी एकून 2 तास 30 मिनीटे म्हणजेच अडीच तासाचा कालावधी दिला जातो.

CBT 2 परीक्षेसाठी अभ्यासक्रम भाग अ (Assistant Loco Pilot Syllabus)

A) गणित – अंकगणित, त्रिकोणमिती, संख्या मालिका, संभाव्यता, बीजगणित, गुणोत्तर आणि प्रमाण, वेग अंतर आणि वेळ, संख्या प्रणाली, नफा आणि तोटा, वेळ आणि काम, व्याज, टक्केवारी, सरासरी इ.

B) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – वर्गीकरण, कोडिंग-डिकोडिंग, वेन आकृती, वर्णमाला आणि शब्द चाचणी, दिशा आणि अंतर, ब्लड रिलेशन, मिसींग नंबर, ऑर्डर आणि रॅकिंग, अॅनालॉजी इ.

C) मुलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी – या अभ्यासक्रमामध्ये मोजमाप, वस्तुमान वजन आणि घनता, कामाची शक्ती आणि ऊर्जा, वेग, उष्णता आणि तापमान, मूलभूत वीज, लीव्हर्स आणि साधी मशीन्स, व्यावयायिक सुरक्षा आणि आरोग्य, पर्यावरण शिक्षण, आयटी साक्षरता इ.

CBT 2 परीक्षेसाठी अभ्यासक्रम भाग ब (Assistant Loco Pilot Syllabus) संबंधित ट्रेड.

D) इलेक्ट्रिकल – इलेक्ट्रीकल इंडीया, रोल्स केबल्स, थ्री-फेज मोचर सिस्टम्स, प्रकाश चुंबकत्व, मुलभूत विद्युत प्रणाली, सिंगल फेज मोटर्स, स्विच, प्लग आणि इलेक्ट्रीकल कनेक्शन

E) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन – ट्रान्झिस्टर, डायस, डिजिटल इलेक्ट्ऱ़ॉनिक्स, नेटवर्किंग आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक ट्यूब, सेमी कंडक्टर भौतिकशास्त्र, रोबोटिक रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम, संगणक आणि मायक्रो प्रोसेसर

F) ऑटोमोबाईल – मशीन डिझाइन, प्रणाली सिद्धांत, आयसी इंजिन, उष्णता हस्तांतरण, थर्मोडायनामिक्स, पॉवर प्लांट टर्बाइन आणि बॉयलर, मेटलर्जिकल उत्पादन तंत्रज्ञान, मटेरियल्स अॅप्लाइंग मोशन

G) मेकॅनिकल – परिमाण, उष्णता, इंजिन, टर्बो मशिनरी, उत्पादन अभियांत्रिकी, ऑटोमेशन अभियांत्रिकी, गतिज सिद्धांत,धातू हाताळणी, मेटलर्जिकल, रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलित, ऊर्जा साहित्य, ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन, अप्लाइड मेकॅनिक्स

महत्वाची सुचना : प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 1/3 या पध्दतीने नकारात्मक गुणपध्दती असणार आहे. म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण वजा केले जाणार.

RRB ALP परीक्षेच्या महत्वपुर्ण जाहिराती पाहण्यासाठी https://www.rrcb.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment