आजकाल बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव या मुळे वजन कमी करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. परंतु दुसरीकडे वजन वाढवणाऱ्यांचही प्रमाणही जास्त आहे. असेही काही लोकं आहेत, ज्याचं वजन काही केल्या वाढत नाही. खूप खाल्ल तर वजन वाढत नाही, अशा तक्रारी या लोकांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. तुम्ही जर योग्य आहार, व्यायाम आणि सातत्य या गोष्टींचा तंतोतंत पालन केलं तर तुमच वजन सुद्धा वाढेल. त्यासाठी आपण सोप्या 10 टिप्स जाणून घेणार आहोत.
1. अधिक प्रमाणात आणि वारंवार खा
दिवसातून 3 वेळा जेवण न करता 5-6 वेळा थोडं-थोडं खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते आणि वजन वाढीस मदत होते.
2. प्रोटीनयुक्त आहार घ्या
प्रोटीन हे वजन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. दूध, अंडी, पनीर, हरभरा, सुकामेवा, मटार, दही यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे दररोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश असला पाहिजे.
3. कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा
शरीराला अधिक उर्जा मिळावी यासाठी उच्च कॅलरी असलेले पदार्थ खा. जसे की तूप, बटर, चीज, सुकामेवा, बटाटे, आणि केळी.
4. स्नॅक्समध्ये सुकामेवा आणि नट्स घ्या
बादाम, अक्रोड, खजूर, काजू यामध्ये भरपूर कॅलरी आणि पोषकतत्त्वं असतात. हे वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे प्रवास करताना किंवा काम करत असताना तुम्ही या गोष्टी खाऊ शकता.
5. दूध आणि दूधजन्य पदार्थांचा भरपूर वापर करा
दूध, दही, ताक, चीज, पनीर हे सर्व वजन वाढीसाठी फायदेशीर आहेत. रोज किमान दोन वेळा दूध प्या.
6. जंक फूड टाळा
पिझ्झा, बर्गर, फ्राय पदार्थांनी वजन वाढतं खरं, पण ते अस्वास्थ्यदायक असतं. त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती पदार्थच खा आणि त्यांनाच प्रथम प्राधान्य द्या.
7. व्यायाम करा – पण योग्य प्रकारचा
वजन वाढवण्यासाठी हलका व्यायाम, जसे की स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा, हे उपयुक्त ठरतं. यामुळे स्नायू वाढतात आणि शरीर मजबूत होतं.
8. जेवणानंतर थोडा वेळ झोपा
दुपारच्या जेवणानंतर 20-30 मिनिटांची झोप शरीराला आराम देते आणि वजन वाढवण्यास मदत करते.
9. पाणी पिण्याची योग्य वेळ ठेवा
जेवणाच्या आधी जास्त पाणी प्यायल्यास भूक कमी होते. त्यामुळे जेवणानंतर किंवा जेवणात थोडं-थोडं पाणी प्या.
10. तणाव दूर ठेवा आणि नीट झोपा
तणाव आणि झोपेचा अभाव हे वजन न वाढण्यामागे मोठं कारण असतं. दररोज 7-8 तासांची झोप अत्यंत आवश्यक आहे.
वजन वाढवणं म्हणजे केवळ खाणं नाही, तर संतुलित आहार, नियमित जीवनशैली आणि संयम यांचा मिलाफ आहे. थोडा वेळ लागेल, पण सातत्य ठेवल्यास नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील.
(टीप – हा फक्त एक माहितीपर लेख आहे. त्यामुळे शरीरावर कोणताही प्रयोग करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला आवर्जून घ्या)