पावसाळा आला की मच्छरांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकजण या मच्छरांच्या (How To Get Rid Of Mosquitoes At Home) त्रासाला कंटाळून जातो. मच्छरांवर उपाय म्हणून केमिकल मिश्रीत अगरबत्ती किंवा लिक्विडचा हमखास वापर केला जातो. परंतु या अगरबत्ती किंवा लिक्विडच्या वासामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. तसेच मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे घरच्या घरी घरगुती उपाय करून तुम्ही मच्छरांना पळवून लावू शकता. ते कसं ते जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.
मच्छरांवर नैसर्गिक उपाय
लवंगामध्ये यूजेनॉल (Eugenol) नावाचं द्रव्य असतं, ज्याचा वास मच्छरांना अजिबात सहन होत नाही. म्हणूनच लवंगाचं तेल हे नैसर्गिक मच्छर repellant म्हणून काम करतं.
लवंकाच तेव वापरण्याची पद्धत
- लवंगाचं तेल आणि नारळाचं तेल सम प्रमाणात मिसळा (उदा. 1 चमचा लवंगाचं तेल + 1 चमचा नारळाचं तेल).
- ही मिश्रण हात, पाय, मान, गळा यावर हलक्या हाताने लावा.
- झोपताना किंवा संध्याकाळी बाहेर बसताना याचा वापर केल्यास मच्छर दूर राहतात.
- तुमच्याकडे लवंगाचं तयार तेल नसेल, तर 7-8 लवंगा थोड्या नारळाच्या तेलात गरम करून त्याचेही घरगुती तेल तयार करता येते.
या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा
- लहान मुलांवर वापरताना आधी थोडंसं चाचणी करून बघा.
- लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे काळजी घ्या
- डोळ्याच्या आसपास न लावता वापर करा.
लवंगाचं तेल हा मच्छरांपासून संरक्षण मिळवण्याचा एक सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक मार्ग आहे. केमिकल्सपासून दूर राहून आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपाय जरूर वापरून पहा. ज्यांना त्वचेचा आजार आहे अशा लोकांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
(टीप – हा एक माहितीपर लेख आहे. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)