VIP Number For Car – नादापुढे सगळं बाद! खास क्रमांकासाठी एक-दोन लाख नव्हे तर कोटींच्या घरात पैसे मोजले, कशी पार पडले लिलाव प्रक्रिया?

‘हौसेला मोल नसतं’, अशी प्रसिद्ध म्हण प्रचलित आहे. हौस पुरवण्यासाठी पैशांचा मागचा पुढचा कोणताही विचार केला जात नाही. हौस पूर्ण करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी हल्लीच्या तरुणांची असते. त्यात विषय गाडीचा असेल, तर VIP क्रमांकासाठी (VIP Number For Car) तरुणांची धडपड पाहण्यासारखी असते. गाडीच्या किंमतीपेक्षा गाडीचा क्रमांकाची किंमत दुप्पट असल्याच्या अनेक बातम्या तुमच्या वाचण्यात आल्या असतील. असाच क्रमांक आता चर्चेचा विषय ठरला आहे. ‘HR88B8888’ हा क्रमांक सध्या मार्केट गाजवताना दिसत आहे. त्याला कारणही तसंच असून या क्रमांकाची किंमत तब्बल 1.17 कोटी रुपये इतकी आहे. भारताच्या आतापर्यंतच्या VIP नंबरप्लेटच्या इतिहासातील सर्वात हा सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक ठरला आहे.

हरियाणा राज्यात दर आठवड्याला VIP किंवा फॅन्सी नंबर प्लेट्ससाठी ऑनलाईन लिलाव आयोजित केला जातो. या आठवड्यात लिलावासाठी उपलब्ध असलेल्या सर्व नंबरपैकी ‘HR88B8888’ या नंबरसाठी कार चालकांची झुंबड पाहायला मिळाली. एकूण 45 अर्ज या नंबरसाठी आले होते. विशेष म्हणजे या नंबरची मुळ किंमत फक्त 50,000 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, बोली लावण्याचा धडाका सुरू झाला आणि किंमत गगनाला भिडत गेली. शेवटी 1.17 कोटी रुपये या विक्रमी किंमतीवर बोली स्थिर झाली आणि क्रमांक विकला गेला. fancy.parivahan.gov.in या अधिकृत सरकारी पोर्टलवर हा संपूर्ण लिलाव प्रक्रिया पार पडली.

व्हिआयपी नंबर कसा मिळवायचा | How To Get VIP Number 

VIP / Fancy Number साठी अर्ज प्रक्रिया कशी पार पाडते. याचे कुतूहल आता तुमच्याही मनात निर्माण झाले असेल. तर, VIP किंवा Fancy Number घेण्यासाठी प्रक्रिया कशी पाडते, हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. 

1) fancy.parivahan.gov.in वेबसाइटला जा

अधिकृत पोर्टल ओपन झाल्यानंतर 

2) तुमचं State आणि RTO निवडा

ज्या RTO मधून नंबर हवा आहे तो विभाग निवडायचा.

3) उपलब्ध नंबरची लिस्ट पाहा

• Premium Numbers
• Super Fancy Numbers
• Special Numbers
• Normal Fancy Numbers

यांची यादी दिसते. बिडिंग (लिलाव) चालू असेल तर तेही दिसते.

4) Registration करा

पहिल्यांदा वापरत असाल तर
• नाव
• मोबाईल नंबर
• ईमेल
• पत्ता
भरून Sign Up करा.

5) नंबर निवडा आणि Participation Fee भरा

प्रत्येक नंबरसाठी:

  • Reservation Fee (स्थिर)
  • Bidding Amount (लिलावासाठी)

दोन्ही लागू शकतात.

6) Online Payment करा

UPI / Debit Card / Net Banking ने.

7) Bidding सुरू असेल तर बोली (Bid) लावा

• बोली वाढवू शकता
• Highest Bidder ला नंबर मिळतो

8) Result जाहीर झाल्यावर Allotment Letter डाउनलोड करा

हा लेटर तुम्हाला नंतर वाहन नोंदणी करताना RTO मध्ये द्यावा लागतो.

9) 90 दिवसांत वाहनाची नोंदणी पूर्ण करा

नाही केल्यास नंबर रद्द होऊ शकतो.

अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या गाडील तुमच्या आवडीचा नंबर घेऊ शकता. 

error: Content is protected !!