How To Sleep Instantly in Marathi – रात्री झोपण्याआधी कराव्यात अशा 5 पॉझिटिव्ह गोष्टी, नक्की करून पाहा

दिवसभर धावपळ केल्यानंतर सर्वांचीच इच्छा असते की शांत झोप लागावी. परंतु काही चुकीच्या सवयींमुळे झोपेचं गणीत बिघडून जातं आणि झोप वेळेवर लागत नाही. झोप वेळेवर न लागल्यामुळे आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम दिसून येतो. कामात लक्ष न लागणे, काम करताना झोप येणे, डोक दुखणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच झोपताना मोबाईल स्क्रोलिंग करणं सुद्धा झोपेच गणित बिघडण्यास कारणीभुत ठरतं असल्याच निदर्शणास आलं आहे. याच गोष्टींचा विचार करून हा लेख लिहिण्यात आला आहे. यामध्ये आपण झोप सुधारण्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेणार आहोत. 

1. दिवसभरातल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा

रोज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडत असतं, पण आपण चांगल्या गोष्टी सोडून फक्त त्रासदायक गोष्टी लक्षात ठेवतो. झोपण्याआधी फक्त 3 चांगल्या गोष्टी आठवा. जसे की, 

  • एखादं चांगलं बोलणं
  • एखाद्याला मदत केली असेल तर
  • स्वतःसाठी घेतलेला वेळ

या गोष्टी रात्री झोपताना विचार केल्यामुळे मन आपोआप “कृतज्ञता” (gratitude) या पॉझिटिव्ह भावनेत जातं, जी मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

2. मोबाईल दूर ठेवा आणि स्वतःशी थोडा वेळ घालवा

मोबाईलमधून सतत बाहेरील जगाशी कनेक्ट राहणं थकवणारं असतं. झोपण्याआधी 15 मिनिटं मोबाईल बंद ठेवा. या 15 मिनिटांच्या वेळेमध्ये

  • स्वतःसोबत गप्पा मारा
  • आवडत्या पुस्तकाची काही पानं वाचून काढा
  • थोडंसं डोळे मिटून ध्यान करा

यामुळे तुमचं मन शांत होतं आणि झोपही लवकर लागते.

3. ‘To-do’ ऐवजी ‘Done list’ बनवा

आपण रोज “करायचं आहे” याची यादी करतो. पण कधी “केलं काय?” याचा विचार करतो का?

रात्री झोपण्याआधी पुढील गोष्टी लिहून काढा, 

  • मी काय केलं?
  • किती गोष्टी पूर्ण केल्या?
  • किती गोष्टी पुढे ढकलल्या आणि का?

ही एक सवय तुमचं आत्ममूल्य वाढवते आणि स्वतःवरचा विश्वास मजबूत करते.

4. श्वासावर लक्ष देऊन 5 मिनिटं ध्यान करा

मनात कितीही विचार असले, तरी श्वासावर लक्ष केंद्रीत केल्यावर मन शांत होऊ लागतं. झोपण्याआधी:

  • शांत जागा निवडा
  • पाठीवर झोपा किंवा बसून डोळे बंद करा
  •  श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा 

हे ‘माइंडफुलनेस’ झोपेसाठी एक नैसर्गिक औषध आहे.

5. स्वतःला माफ करा आणि शांत झोपा

दिवसभरात आपण काही चुका करतो, उगाच त्रास घेतो. त्या सगळ्या गोष्टी झोपेच्या आधी मनातून सोडून द्या. स्वतःशी म्हणा:

“आज जे झालं, ते ठिक आहे. मी शिकतोय. उद्या आणखी चांगलं करेन.”

माफ करणं म्हणजे दुर्बळ होणं नाही – तर ते मानसिक स्वच्छतेसाठी आवश्यक असतं.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काय करता, याचा तुमच्या झोपेवरच नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो. वाईट विचार, स्क्रीन, चिंता सोडून जर तुम्ही या 5 सकारात्मक सवयी अंगीकारल्या, तर तुम्ही अधिक शांत, आनंदी आणि उर्जायुक्त आयुष्य जगू शकता.