फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा देश क्रिकेटच मैदान गाजवणार! नेदरलँडसह युरोपचा आणखी एक देश T20 World Cup साठी पात्र

ICC Men’s T20 World Cup 2026 पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. फेब्रुवारी-मार्च या कालावधीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा वर्ल्ड कप विशेष ठरणार आहे. कारण या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणारा इटली हा देश मैदानात उतरणार आहे. इटलीच्या संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत टी20 वर्ल्ड कप युरोप क्वालिफायर 2025 च्या माध्यमातून वर्ल्डकपच तिकीट पक्क केलं आहे. यासोबत नेदरलँडने सुद्धा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे.

पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे टी20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत, श्रीलंका, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा या देशांचा यापूर्वीच समावेश झालेला आहे. आता नेदरलँड आणि इटली या देशांनी सुद्धा आपलं तिकीट पक्क केलं आहे. अजूनही पाच संघ वर्ल्ड कप तिकीटाच्या प्रतिक्षेत आहेत. या पाच संघांपैकी 2 संघ आफ्रिका क्वालिफायर आणि 3 संघ आशिया-ईएपी क्वालिफायर च्या माध्यामातून पात्र ठरणार आहेत.