IND Vs ENG 3rd Test Match – Team India च्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद, सामना सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला टाकलं मागे

IND Vs ENG 3rd Test Match

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये Anderson-Tendulkar ही पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या हातून विजय निसटला आणि इंग्लंडने 5 विकेटने बाजी मारली. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत 336 धावांच्या मोठ्या फरकाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यामुळे मालिका आता 1-1 अशी बरोबर आहे. गुरुवार (10 जुलै 2025) पासून क्रिकेटची पंढरी म्हणजेच लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक गमावली आणि टीम इंडियाने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.

दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवला असल्यामुळे ऐतिहासिक लॉर्ड्सवर विजय संपादित करून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. मात्र या सामन्यात सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाने वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 13 वेळा नाणेफेकीचा कौल गमावला आहे. याचसोबत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा सर्वाधिक नाणेफेक गमावण्याचा विक्रम मोडित काढला आहे. वेस्ट इंडिजाने 2 फेब्रुवारी 1999 ते 21 एप्रिला 1999 या काळात सलग 12 वेळा टॉस हारला होता. तर टीम इंडियाने आता 31 जानेवारी 2025 ते 10 जुलै 2025 या काळात 13 टॉस गमावले आहेत. यामध्ये रोहित शर्माने 8 वेळा, शुभमन गिलने 3 वेळा आणि सूर्यकुमार यादवने 2 वेळा टॉस हारला आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलने तिन्ही सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे.