IND Vs SA Test – सायमन हार्मरचा टीम इंडियाला दणका! सामना फिरवला आणि दक्षिण आफ्रिका 30 धावांनी विजयी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. प्रथम टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी केली, तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही त्याच तोडीची गोलंदाजी करत यजमानांची दाणादाण उडवली. दोन्ही संघांना एकाही डावात 200 चा आकडा पार करता आला नाही. लो स्कोरींग झालेल्या या यामन्यात अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी 4-4 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या विजयामध्ये खारीचा वाटा उचलला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना आता 22 ते 26 नोव्हेंबर रोजी बार्सापार क्रिकेट स्टेडियम, आसाम येथे खेळला जाणार आहे. 

error: Content is protected !!