IND Vs SA First Test – 13 वर्षांनी पुनरावृत्ती! शुभमन गिलनेही तेच केलं जे महेंद्र सिंग धोनीने केलं होतं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमानांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ही मालिका World Test Championship 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने फिरकीच जाळ पसरलं आहे. असंच फिरकीच जाळं 13 वर्षांपूर्वी महेंद्र सिंग धोनीने टाकलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता शुभमन गिलच्या नेतृत्वात पाहायला मिळत आहे.

भारताने या सामन्यामध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या चार फिरकीपटूंना संघात स्थान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या पायात बेड्या घालण्यासाठी फिरकीपटू सज्ज झाले आहेत. 13 वर्षांपूर्वी 1012 साली नागपूर कसोटीमध्ये टीम इंडियाने सर्वप्रथम चार फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना खेळला गेला होता. तेव्हा महेंद्र सिंग धोनी भारताचा कर्णधार होता. त्या सामन्यात रवींद्र जडेजा, आर अश्विन, पीयूष चावला आणि प्रज्ञान ओझा हे चार फिरकीटू मैदानात उतरले होते.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना सुरू झाला असून 27 षटकांचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट गमावत 105 धावा केल्या होत्या. सध्या विआन मुल्डर (22*) आणि टोनी डी झोर्झी (15*) हे दोघे नाबाद फलंदाजी करत आहेत.

error: Content is protected !!