Inspirational Video – आजीबाईंची बुलेटस्वारी! वयाच्या 60व्या वर्षी नव्या इनिंगला सुरुवात

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने अनेक गोष्टी करता येतात, परंतू मनात तशी जिद्द हवी. उतरत्या वयात विविध आजारांचा अनेकांना सामना करावा लागतो. त्यामुळे हालचाल मंदावते आणि नव्याने काही गोष्टी करण्यासाठी उत्साह राहत नाही. पण या सर्व गोष्टी हाताळून आज अनेक जण उतरत्या वयातही आपली आवड जोपासण्याचं काम करत आहेत, आपल्या अपुऱ्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. अशाच एक 60 वर्षांच्या मनाने तरुण असलेल्या आजीबाईंनी निवृत्तीनंतर पुन्हा एकदा आपल्या नव्या स्वप्नाच्या दिशेने आपला नवीन प्रवास सुरू केला आहे. लता श्रीनिवासन असे त्यांचे नाव आहे. कॉर्पोरेट व्यावसायिक आणि सायकलिस्ट असणाऱ्या लता यांनी यापूर्वी एकाच वेळी 50 किमी पेक्षा अधिक सायकल चालवण्याची कामगिरी केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ (Inspirational Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. thebetterindia आणि cafecruisers_academy ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Better India (@thebetterindia)

 

error: Content is protected !!