सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात इतबरही कसूर केला नाही. दिवाळी निमित्त महाराष्ट्रातील काही दुर्लक्षीत गडांची आपण माहिती घेत आहोत. धाकोबा गडाविषयी माहिती आपण मागच्या ब्लॉकमध्ये पाहिली. धाकोबा गडासारखाच एक गड सातारा जिल्ह्यातील पाटणच्या खोऱ्यात आपलं अस्तित्व टिकवून उभा आहे. जगंली जयगड (Jangli Jaigad) या नावाप्रमाणे प्रचलित असणारा हा गड थरकाप उडवणाऱ्या जंगलासाठी ओळखला जातो.
मुघल, आदिलशाहीसह अनेक सत्तांनी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये असणाऱ्या गडांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. औरंगबजेब, अफझलखान अल्लाउद्दीन खिलजीसह अनेक मातब्बर शत्रूंचा सुद्धा सह्याद्रीमध्ये फिरताना थरकाप उडायचा. जंगली जयगडची रचना सुद्धा थोड्या फार फरकाने अशीच आहे. गडावर जाणारी वाट घनदाट जंगलाने व्यापलेली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या रौद्ररुपाची या गडावर जाताना ओळख होते. वेळ न दवडता या गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
गडाचा ठावठिकाणा आणि इतिहास
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून साऱ्या जगात कोयना धरणाचं नाव आहे. कोयना धराणाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती केली जाते. त्यामुळे कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. याच कोयना धरणाऱ्या कुशीत जंगली जयगडाचे वास्तव्य आहे. त्यामुळे या गडावर ट्रेक करण्यासाठी येणाऱ्यांना कोयना धरणाचे मनमोहक रूप आणि जगंली जयगडाचे विस्तृत दर्शन घेता येणार आहे.
कोयना धरणाच्या शेजारी कोयनानगर या नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावापासून 12 किलो मीटरच्या अंतरावर जंगली जयगडाचे वास्तव्य आहे. या गडाचा आणि गडाच्या आजूबाजूचा परिसर विस्तीर्ण घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. इतर गडांच्या तुलनेत या गडावर आणि गडाच्या आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे या गडाचे नामकर जंगली जयगड असे करण्यात आले होते. घनदाट जंगल असल्यामुळे या भागात मोठ्या संख्यने हिंस्त्र प्राण्यांचा वावर तेव्हाही होता आणि आजही आहे. वाघ, बिबटे, विषारी साप आणि अस्वलांची संख्या या जंगलामध्ये मोठ्या संख्येने आहे.
Ajoba Fort – लव-कुश यांचे जन्मस्थळ, का पडले आजोबा गड असे नाव? वाचा सविस्तर…
गडाच्या इतिहासा विषयी फारसा उल्लेख आढळून येत नाही. गडाचा इतिहास शोधून काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, इतिहासा विषयी माहिती मिळू शकली नाही. गडाची रचना आणि गडाच्या परिसरात असलेले घनदाट जंगल पाहता कैद्यांना ठेवण्यासाठी गडाचा वापर केला जात असावा. तसेच कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी गडाचा वापर केला जात असावा अशी शक्यता आहे. या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे घाटमाथ्याच्या टोकावर पोहचल्यानंतर गडावरून कोकणाचे आल्हाददायक रूप पाहता येत.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
जंगली जयगड या नावातच गडाची दहशत काय असेल याचा अंदाज तुम्ही मनातल्या मनात का होईना बांधत असाल. तुम्ही वरती वाचलं असेल की नावाप्रमाणे हा गड घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे गडावर जाताना एका सुंदर ट्रेकचा अनुभव घेता येणार आहे.
कोयनानगरच्या अगदी बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून वरती आल्यानंतर तुम्हाला सह्याद्रीचा फाटा व त्यावर किल्ला नजरेल पडेल. याच ठिकाणी गडाचे प्रवेशद्वार आहे. मात्र, हे प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालेले आहे. गडाच्या टोकाकडे जाण्यासाठी आपल्याला दीपमाळ ला वळसा घालून जावे लागते. दीपमाळ म्हणजे वाटेत असणाऱ्या दोन छोट्या कातळ सुळक्यांना स्थानिक लोकांनी दिलेले नाव आहे. गडावर देवीचे मंदिर आणि स्वराज्याचा भगवा आहे. गडावरून आपल्याला कोकणाचं देखण सौंदर्य पाहता येत. सर्व थकवा या ठिकाणी निघून जातो. त्याच बरोबर गडावरून केळकेवाडी गड आणि केळकेवाडी धरणाचा विहंगम नजारा सुद्धा पाहता येतो. गडाच्या आजूबाजूला विस्तीर्ण नजर फिरवल्यास आपल्याला चिपळून शहर, वसिष्टी खाडी, कुंभार्ली घाट पहायला मिळतो.
गडावर जायचं कसं
गडावर जाण्यासाठी गडाच्या पायथ्याला असलेल्या कोयनानगर या गावात तुम्हाला यावं लागणार आहे. कोयनानगर गाव चिपळून कराड या रस्त्यावर पाटण तालुक्यामध्ये आहे. कोयनानगरहून तुम्हाला 11 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नवजा या गावात जायचे आहे. नवजा गावातून पंचधारा नावाच बोगदा आणि तिथून पुढे 500 मीटर चालत गेल्यानंतर एक चौकी लागते. या ठिकाणी गाडी घेऊन जाता येते. या ठिकाणाहून डोंगरात गेलेल्या रस्त्याची वाट धरून गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. गडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी साधारण 1 ते दीड तास लागू शकतो.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
जंगली गड घनदाट जंगलात वसलेला आहे. त्यामुळे या गडावर फारशी वर्दळ नसते. याच कारणामुळे गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय नाही. तसेच गडावर राहणे धोकादायक ठरू शकते. तुम्हाला जर मुक्काम करायचाच असेल तर, कोयनानगर आणि नवजा गावांमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये राहता येऊ शकते.
जंगली जयगड आणि महत्त्वाच्या सुचना
गडाचा इतिहास आणि गडा विषयी मुलभुत माहिती तुम्हाला भेटली असेल. त्यामुळे गडावर जाण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक झाला असाल. मात्र, गडावर जाण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
गडावर जाण्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे गड घनदाट जंगलांमध्ये आहे. त्यामुळे जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन जाणे. तसेच गडावर जाण्यासाठी असणाऱ्या वाटेमध्ये एक चौकी आहे. या चौकीतून रितसर परवानगी घ्यावी लागते.
सर्वात महत्त्वाची सुचना
आपला गड आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखा गडावर कचरा करून देऊ नका आणि करू नका.
जय शिवराय
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.