Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय

स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरात या पाच राज्यांचा समावेश करण्यात आला होता. या पाच राज्यांमधील 50 लाख ते 1 लाख लोखसंखेच्या आत असणाऱ्या नगरपालिकांचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला होता. कराड पालिकेने यापूर्वी 2019 आणि 2020 मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर 2021 मध्ये सहावा, 2022 मध्ये तिसरा पुरस्कार पटकावला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवल काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापनामधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मागच्या वर्षी दिल्ली येथे कराड नगरपालिकेला पुरस्कार देण्यात आला हातो. आता पुन्हा एकदा कराड पालिकेने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्याधिकार प्रशांत व्हटकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी पुरस्कार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a comment