11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी Kotak Junior Scholarship Program, 73 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती

Kotak Junior Scholarship Program 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील SSC/CBSE/ICSE बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यास मदत होईल. 

ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल अशा विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये दरमहिना 3,500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती 21 महिन्यांसाठी असून एकूण 75,500 रुपये शिष्यवृत्ती स्वरुपात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

पात्रता

  • अर्ज करणारे विद्यार्थी २०२५ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेत (SSC/CBSE/ICSE) एकूण ८५% किंवा त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण असले पाहिजेत.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालये/शाळांमध्ये ११ वी मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशात वास्तव्याला असला पाहिजे.

शिष्यवृत्तीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

पुढील कागदपत्र अनिवार्य आहेत

  1. SSC/ICSE/CBSE मार्गशीट (ई-कॉपी सुद्धा चालेल)
  2. उत्पन्नाचा दाखला (महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडून आर्थिक वर्ष 202-26 मध्ये जारी केलेला)
  3. सध्या काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
  4. पालकांचे आणि अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड

पुढील कागदपत्र सुद्धा गरजेची आहेत

  1. आई किंवा वडिलांचा कोणाचाही एकाच पॅन कार्ड
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरला असेल किंवा आयकर रिटर्न भरा असेल, तर आयकर रिटर्नची नवीनतम प्रत 26AS/Form 16 (अनिवार्य)
  4. जर अर्ज करणारा विद्यार्थ्याला आई किंवा वडील नसतील, तर मृत्यू प्रमाणपत्र
  5. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे बँक खाते (बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक्या पहिल्या पानाची झेरॉक्स)

MMR प्रदेशांमध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, ठाणे जिल्हा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, वसई, विरार, पालघर, रायगड जिल्हा -पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका यांचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Kotak Junior Scholarship Program 2025-26

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025