Kotak Kanya Scholarship 2025-26 – वर्षाला 1.5 लाख रुपयांच आर्थिक सहाय्य, लगेच अर्ज करा

भारतातील हुशार, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2025-26 ही करिअर घडविण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आजच्या घडीला मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु काही वेळा आर्थिक परिस्थिती अभावी मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं किंवा जे शिकण्याची इच्छा आहे, ते शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती हा सर्वोत्तम पर्याय आहे. चांगलं शिक्षण घेण्याची ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. परंतु बऱ्याच मुलींना अशा शिष्यवृत्तींबद्दल पुरेशी माहिती नसते. पण आता घाबरण्याची गरज नाही. आपण दररोज शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती आपल्या वेबसाईटवर पोस्ट करणार आहोत.

पात्रता काय आहे?

Kotak Kanya Scholarship 2025-26 साठी पात्र ठरण्यासाठी अर्जदाराने पुढील निकषांची पुर्तता करणं गरजेचं आहे.

  • कोटक कन्या शिष्यवृत्ती भारतातील सर्व मुलींसाठी खुली आहे.
  • अर्ज करणारी विद्यार्थीनी बारावी बोर्ड परीक्षेत किमान 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेली असावी किंवा समतुल्य CGPA मिळवलेला असावा.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीने 2025-26 शैक्षणिक वर्षात NIRF/NAAC मान्यताप्राप्त संस्थांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदवी कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असावा. जसे की, अभियांत्रिकी, MBBS, LLB (5 वर्ष), एकात्मिक BS/MS संशोधन, ISER, IISC (बंगळुरू) किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम (डिझाइन, आर्किटेक्चर इ.).
  • कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.

कागदपत्र कोणती लागणार?

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीने बारावीची गुणपत्रिका
  • महाविद्यालयी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड
  • कॉलेजच्या जागा वाटपाचे दस्तऐवज
  • शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी फी रचना
  • पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • आर्थिक वर्ष 2024-25 साठी पालकांचा आयटीआर (उपलब्ध असल्यास)
  • महाविद्यालयाकडून बोनाफाईड
  • आधार कार्ड
  • बॅंकेचे पासबुक
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पालकांचे मृत्यूपत्र (एक पालक किंवा अनाथ विद्यार्थीनींसाठी)
  • घराचे फोटो

फायदा आणि निवड कशापद्धतीने होणार?

अर्ज करणाऱ्या विद्यार्थीनीची निवड प्रथम शैक्षणिक गुणवत्तेवर आणि आर्थिक पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणऱ्या विद्यार्थीनींची दोन फेऱ्यांमध्ये मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर अंतिम निवड ही रँकनुसार आधारित असेल तसेच कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या विवेकबुद्धीनुसार निवड केली जाईल.

ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड होईल, त्या विद्यार्थीनींना व्यावसायिक पदवीच्या समाप्तीपर्यंत दरवर्षी 1.5 लाख रुपये मिळतील. शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, इंटरनेट, लॅपटॉप, वाहतुक, पुस्तके आणि स्टेशनरी सारख्या शैक्षणिक खर्चासाठी वापरली पाहिजे.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Kotak Kanya Scholarship 2025-26

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2025