Labubu Doll DIY – काय सांगता! हजारोंची लबुबू डॉल आता फक्त 100 रुपयांत, झटपट बनवा घरच्या घरी

Labubu Doll DIY बाहुली म्हंटल की आपल्या डो्ळ्यासमोर येते ती सुंदर, देखणी बार्बी डॉल. मार्केटमध्ये बार्बी डॉल, तात्या विंचू यांसारख्या बाहुल्यांचे सतत ट्रेंड सुरू असतात. अशीच एक विचित्र आणि भयानक दिसणारी एक बाहुली सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मोठे डोळे, राक्षसी टोकदार दात आणि राक्षसी हास्य असलेली ही बाहुली लोकांच्या पसंतीच उतरत आहे. ‘Labubu’ असे या डॉलचे नाव आहे. ऑफिस बॅगला, पर्सला किंवा अगदी कपड्यांवर सुद्धा या डॉलचा वापर केला जात आहे. जगभरातून या डॉलची मागणी वाढतेय. त्यामुळे या डॉलची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अवाढव्य किंमतीमुळे सर्वांनाच ही डॉल खरेदी करणे शक्य नाही. चला तर मग जाणून घेऊया ही डॉल नेमकी आहे काय? तिला जगभरातून इतकी पसंती का मिळतेय? आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे 100 रुपयांत डॉल बनवायची कशी? 

लबुबू म्हणजे काय?

लबुबू हे एक काल्पनिक पात्र आहे. हे 2015 मध्ये हाँगकाँगचा एक प्रसिद्ध कलाकार ‘कासिंग लंग’ यांनी द माँन्स्टर्स नावाच्या मालिकेअंतर्गत काही खेळणी तयार केली होती. त्यापैकीच ही एक लबुलू डॉल. या डॉलचा लूक जितका भयानक आहे तितकाच गोंडस आणि स्टायलिश दिसत आहे. या डॉलचे मोठे डोळे, अजब हास्य, टोकदार कान नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावत आहे.

लाबूबूची लोकप्रियता कशी वाढली?

लबुबूला चिनी कंपनी पॉप मार्टने प्रसिद्धी दिली. 2019 मध्ये कंपनीने ही डॉल ‘ब्लाइंड बॉक्स’ स्वरूपात विकण्यास सुरुवात केली. ‘ब्लाइंड बॉक्स’ ही या कंपनीती जुनी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे. म्हणजेच ही डॉल एका बॉक्समध्ये पॅक केली जाते, पण ग्राहकाला या बॉक्सच्या आत नेमकी कोणती डॉल आहे हे माहित नसते. त्यामुळे एखाद्या ‘लकी ड्रॉ’ प्रमाणे ग्राहक ते खरेदी करत आहेत. जोपर्यंत त्यांना त्यांच्या पसंतीची लबुबू सापडत नाही तोपर्यंत ते हे ब्लाइंड बॉक्स पुन्हा पुन्हा खरेदी करतात. यामुळे लबुबू बाहुलीची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली.

किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल

अलिकडेच, बीजिंगमध्ये 131 सेमी उंच लबुबू बाहुलीचा लिलाव 1.08 दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे 1.2 कोटी रुपयांना झाला. इतकेच नाही तर त्याच्या लहान आवृत्त्याही लाखो रुपयांना विकल्या जात आहेत.

DIY OF LABUBU DOLL

हजारो लाखोंच्या घरात विकली जाणारी ही डॉल तुम्हालाही हवीय का? पण एका डॉलसाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. आता तुम्ही अवघ्या १०० रुपयांमध्ये ही ट्रेंडी लबुबू डॉल बनवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या रंगाची लोकर, एक पुठ्ठा, काही वॉटर कलर्स, आणि Fevicryl Mould It Clay Set ची आवश्यकता आहे.

फक्त चार स्टेप आणि लबुबू डॉल तयार

  1. सर्वात आधी तुम्हाला लबुबू डॉलचे हात, पाय, पोटाचा आणि डोक्याच्या आकाराचा पुठ्ठा कापून घ्यावा लागेल.
  2. यानंतर त्या पुठ्ठ्याला लोकर गुंडाळून लबुबूचे अवयव बनवा.
  3. एका सुती दोऱ्याने हे सगळे अवयव जोडा.
  4. मग मोल्ड क्ले चा वापर करून लबुबू डॉलचा चेहरा, हाताचा, पायाचा पंजा बनवा आणि त्याला कलर करून तो आपल्या डॉलला जोडा.

झाली तयार तुमची हजारो रुपयांची डॉल तयार.

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते लबुबूसारखी एक कुरुप दिसणारी बाहुली सध्याच्या पिढीला प्रचंड आवडतेय. मात्र यापासून आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. या विचित्र दिसणाऱ्या बाहुल्यांमुळे काहींना भयानक स्वप्ने पडू लागली आहेत, तर काहींना NAGATIVE ENERGY चा भास होत असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र हे सगळं संवेदनीतलेवर अवलंबून असते.

(डॉल बनवण्यास काहीही अडचण येत असेल तर, तुम्ही YouTube वर आणि सोशल मीडियावर लबुबू डॉल  बनवण्याची पद्धत पाहू शकता)