Mahabaleshwar News – मोठी बातमी! महाबळेश्वरमार्गे पोलादपूरला जाणार असाल तर थांबा, आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद

महाबळेश्वरहून (Mahabaleshwar News) पोलादपूरला जाण्यासाठी आंबेनळी घाटातून प्रवास करावा लागतो. परंतु आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडल्यामुळे घाट पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सुचना जारी केल्या आहेत.

महाबळेश्वर पोलादपूर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असते. याच पावसामुळे आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत असलेल्या पायटा गावाजवळ गुरुवारी (10 जुलै 2025) संध्याकाळच्या सुमारास मोठी दरड कोसळली. सुदैवाने या घटनते जीवीतहानी झाली नाही. परंतु रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला असून दरड हटवण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आंबेनळी घाट पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणाऱ्या आणि पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाने प्रवास करणे टाळावे, असे आवाहान पोलादपूर तहसीलदार यांनी केले आहे.

error: Content is protected !!