Mahabaleshwar News – महाबळेश्वर-पाचगणीत मुसळधार, वेण्णा नदीला पूर; पाहा Video

महाबळेश्वर (Mahabaleshwar News ) आणि पाचगणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास महाबळेश्वर-पाचगणी रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.