सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये धुवांधार पाऊस कोसळला आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसला आहे. तसेच सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने वाई, महाबळेश्वर, कराड, पाटण, सातारा आणि जावळी तालुक्यांमधील शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि गुरुवार (21 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाबळेश्वर (Mahabaleshwar Rain News) तालुक्यातीर भिलार येथे रात्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रप्रमुखांच्या कार्यालयाची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कार्यालयाचं प्रचंड नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलार येथील जि. प. प्राथमिक शाळा केंद्रप्रुखांचे कार्यलय असलेल्या खोलीची भिंत मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) रात्री पडल्याच निदर्शनास आलं आहे. याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाय, सातारा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेत किती नुकसान झालं, जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
सातारा जिल्ह्यातील भिलार महाबळेश्वर येथील जि. प. प्राथमिक शाळा केंद्रप्रमुखांचे कार्यालय असलेल्या खोलीची भिंत रात्री पडलेली आहे. pic.twitter.com/tPUNmvr7RN
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) August 20, 2025
Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video