Coldrif Syrup अजिबात घेऊ नका, 17 चिमुकल्यांचा मृत्यू; महाराष्ट्र FDA ने केले सावध

Coldrif Syrup या औषधामुळे किडनी खराब होऊन 17 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 14 आणि राजस्थानातील 3 मुलांचा या कोल्ड्रिफ सिरप औषधामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे SR-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप अजिबात वापरू नका, असा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिला आहे.

कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर 17 मुलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चौकशी केली असता या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोन हा विषारी घटक आढळून आला आहे. यामुळे किडनी खराब होऊन मृत्यू होत असल्याचे समोर आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोल्ड्रिफ सिरपची विक्री, वितरण आणि वापर तात्काळ थांबवण्याचे आवाहन विक्रेते वा ग्राहकांना महाराष्ट्र एफडीएच्या वतीने करण्यात आलं आहे. तसेच एफडीच्या सर्व निरीक्षकांनी व सहाय्यक आयुक्तांनी घाऊक व किरकोळ विक्रेते आणि रुग्णालयांना या सिरपचा उपलब्ध स्टॉक सील करण्याच्या सुचना दिल्या आहेत. Hindustan Times ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

तुमच्याकडे कोल्ड्रिफ सिरप असेल तर लगेच कॉल करा

तुमच्यापैकी कोणाकडेही हे S-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप असेल तर त्यांनी तात्काळ 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा किंवा jch q.fda-mah@nic.in या मेल करावा, असे आवाहन महाराष्ट्र एफडीएच्या वतीने करण्यात आले आहे.