Mahila Samriddhi Yojana – ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळणार! कसा होणार फायदा? वाचा…

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे देशाच्या समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांच्या हाताखाली पुरुष काम करत आहेत. बऱ्याच महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादित केलं आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत आजही ग्रामीण भागातील महिला काही प्रमाणात पिछाडीवर आहेत. पुरेशा माहितीचा अभाव, पैशांची कमतरता, कुटुंबातील सदस्यांची छोटी मानसिकता आणि प्रोत्साहन देण्यासाठी कोणीही नसने. या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रगती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागलतो. या सर्व गोष्टींचा विचार करूनच केंद्र आणि विविध राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना जी ग्रामीण भागातील महिलांना पुढचं पाऊल टाकण्याची संधी देते ती म्हणजे Mahila Samriddhi Yojana होय.  ही योजना विशेषतः ग्रामिण व गरजू महिलांच्या बचतीची सवय लावणे आणि उद्योजकतेस प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

योजनेची थोडक्यात माहिती

  • योजनेचे नाव महिला समृद्धी योजना
  • सुरुवात 1993 मध्ये (सुरुवातीस केंद्र सरकारने), विविध बँका व राज्य सरकारांमार्फत राबवली जाते
  • लक्ष्यित लाभार्थी ग्रामीण व अल्प उत्पन्न गटातील महिला
  • प्रमुख घटक बचतीची सवय, अल्पदरात कर्ज, स्वयंरोजगार प्रोत्साहन
  • संपर्क संस्था पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँका, ग्राम पंचायत, महिला बचत गट

योजनेची वैशिष्ट्ये

बचत खात्याची सुविधा – महिलांना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत बचत खाते उघडण्यास मदत केली जाते. अगदी ₹10 पासून बचत करण्याची संधी दिली जाते.

शिक्षण व उद्योजकतेसाठी कर्ज – महिलांना लघुउद्योग, व्यवसाय, शिक्षण किंवा शेतीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कर्ज मिळते.

गट-आधारित प्रोत्साहन – स्वयं-सहायता गट (SHG) च्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून प्रशिक्षण, कर्ज, व्यवसाय मार्गदर्शन दिले जाते.

व्यवसाय प्रशिक्षण – महिलांना शिवणकाम, अन्न प्रक्रिया, हस्तकला, सौंदर्य पार्लर, मशरूम शेती यांसारख्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.

योजनेचे फायदे

  • महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते
  • घर खर्चाव्यतिरिक्त बचतीची सवय लागते
  • महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो
  • गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतात
  • SHG च्या माध्यमातून सामूहिक निर्णयक्षमता वाढते

सध्या योजना कुठे राबवली जाते?

ही योजना भारतातील अनेक राज्यांमध्ये राज्य ग्रामीण आजीविका मिशन, बँका, पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून राबवली जात आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांमार्फत ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी संपर्क

  • जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत संपर्क करा
  • ग्रामपंचायत किंवा तालुका स्तरीय ग्रामीण विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा
  • SHG गट किंवा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून माहिती मिळवा

महिला समृद्धी योजना ही केवळ एक आर्थिक योजना नसून, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे साधन आहे. ग्रामीण महिलांच्या हातात आर्थिक सामर्थ्य दिल्यास, त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो. अशा योजनांच्या माध्यमातून ‘सबला नारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात आहे. 

तुम्ही सुद्धा काहीतरी नवीन करण्याच्या विचारात आहात पण योग्य मार्ग मिळत नाहीये. तर नक्कीच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी एक मार्ग मिळेल.