Maratha Military Landscape – हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या काळातील 12 किल्ल्यांच नामांकन पाठवण्यात आलं होतं. 2024-25 या वर्षासाठी भारत सरकारडून ‘Maratha Military Landscape of India’ म्हणजेच भारतीय लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे देण्यात आला होता.

युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या गडांमध्ये स्वराज्याची राजधानी रायगड, किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. भविष्यात या सर्व गडांचा सुवर्ण इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचेलच तसेच गडांचा विकास होण्यासही हातभार लागणार आहे.