Mumbai Crime – मुंबई हादरली; 10 वर्षीय चिमुकलीवर आईच्याच प्रियकराने केला अत्याचार, गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर

देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात डंका वाजवणाऱ्या मुंबईत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर अमानवी अत्याचार करण्यात आला आहे. 24 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला आणि तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकून त्याचा व्हिडीओ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला आणि मुलीच्या आईला अटक केली आहे.

जोगेश्वर पूर्व येथे 10 वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत वास्तव्याला आहे. मुलीच्या आईचा 24 वर्षीय प्रियकर ती कामावर गेल्यानंतर चिमुकलीवर अत्याचार करत होता. अत्यंत क्रूर पद्धतीने त्याने चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकला आणि या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ शुट केला. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चिमुकलीवर पुन्हा चार वेळा अत्याचार केला. आईला हा सर्व प्रकार कळताच नराधमाने तिच्यावरही हल्ला केला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. चिमुकलीच्या आईने हिंमत करत मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 24 वर्षीय नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधमासह चिमुकलीच्या आईला सुद्धा अटक केली आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

error: Content is protected !!