Mumbai Crime – दारूमुळे दोन मुलं अनाथ झाली; बेवड्या पतीने पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून केला

दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याची अनेक प्रकरण तुम्ही पाहिली असतील. लहान मुलांचा सुद्धा या प्रकरणांमध्ये हकनाक जीव गेला आहे. आता मुंबईत (Mumbai Crime) असाच धक्कादायक प्रकार घडला असून दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका दारुड्या पतीने आणि दोन मुलांच्या बापाने आपल्याच पत्नीचा जीव घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांसमोरच त्याने पत्नीची निर्घृण खून केल्याने सगळेच हारदरून गेले आहेत.

How To File FIR Online – एफआयआर म्हणजे काय? तक्रारदाराचे अधिकार काय? घाबरू नका आपला हक्क जाणून घ्या…

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे सोमवारी (24 जून 2025) ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वासीम रफिक शेख याला दारूच व्यसन होतं. त्यामुळे वारंवार दारू पिण्यासाठी तो पत्नी गौशियाकडे पैशांची मागणी करत असे. घटना घडली त्यादिवशीसुद्धा त्याने गौशियाकडे पैशांसाठी तगादा लावला. गौशियाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वसीमने वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि वसीमने दोन लहान मुलांसमोर गौशियाचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी गौशियाच्या वडिलांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यास वसीमविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!