महाराष्ट्र सरकारची Eklavya Scholarship 2024-25 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या कायदा, वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, कायदा आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. आणि आता जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत किंवा घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल, त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल.
Eklavya Scholarship साठी पात्रता काय आहे?
- अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्रात राहणारा असावा
- अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्रातील संस्था किंवा विद्यापीठातून वाणिज्या, कला किंवा कायदा या शाखेतून किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा.
- अर्ज करणारा विद्यार्थी विज्ञान शाखेतून 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्ज करणारा विद्यार्थी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कुठेही नोकरीला नसावा.
Eklavya Scholarship साठी कागदपत्रे कोणती लागणार?
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे.
- पदवी उत्तीर्ण केलेली मार्कशिट आणि प्रमाणपत्र.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याकडे Domicile Certificate असलं पाहिजे.
अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Eklavya Scholarship, Maharashtra 2024-25
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025