गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. फलंदाजांनी आगळे वेगळे शॉट मारण्यास सुरुवात केल्यामुळे क्रिकेट पाहणाऱ्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. प्रामुख्याने टी-20 क्रिकेटची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मॅरीलेबोन क्रिकेट क्लब क्रिकेटमध्ये नवनवे नियम लागू करत आहेत. आता यात आणखी एका नव्या नियमाची (New Rule In Cricket) भर पडली आहे. नव्या नियमानुसार आता फलंदाजांना स्टंम्पच्या मागे जाऊन शॉट मारता येणार नाही. ICC चे माजी अंपायर अनिल चौधरी यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
अनिल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता फलंदाजांना स्टम्पच्या मागे जाऊन शॉट मारता येणार नाही. म्हणजेच एखादा फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर स्टम्पच्या मागे शॉट मारण्यास गेला, तर तो चेंडू ‘डेड बॉल’ म्हणून घोषित केला जाणार आहे. तसेच या चेंडूवर खेळाडू बाद झाल्यास त्याला बाद दिलं जाईल, ICC ने हा नवीन नियम लागू केला आहे. अनिल चौधरी यांनी व्हिडीओमध्ये स्टम्पच्या मागे जाऊन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं आहे.
View this post on Instagram