Oriental Insurance Vacancy 2025 – ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 पदांची भरती, कोणत्याही शाखेतील पदवी असणार्‍यांना संधी

तुमची पदवी पूर्ण झाली आहे परंतु अद्याप नोकरी मिळालेली नाही. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कारण ओरिएंटल इन्शुरन्समध्ये (Oriental Insurance Vacancy 2025 ) नोकरी करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. असिस्टंट पदासाठी भरती केली जाणार असून 500 पद भरली जाणार आहेत. या भरतीअंतर्गत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असा टप्पा असणार आहे. दोन्ही परीक्षांच्या तारखा वेगवेगळ्या असून उमेदवारांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

एकूण किती पद भरली जाणार – 500

वयाची मर्यादा – 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2025

पूर्व परीक्षा – 7 सप्टेंबर 2025

मुख्य परीक्षा – 28 ऑक्टोबर 2025

सविस्तर माहितीसाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करा – https://ibpsonline.ibps.in