Satara News – साताऱ्यात दुर्मीळ शस्त्रक्रिया; पहिली जुळी मुलं, नंतर मुलगी आणि आता महिलेने चार अपत्यांना दिला जन्म

साताऱ्यामध्ये (Satara News) एक दुर्मीळ घटना घडली असून एका महिलेने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या 28 वर्षीय महिलेची ही तिसरी प्रसूती असून पहिल्या प्रसूतीवेळी जुळ्या मुलांना आणि त्यानंतर एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, या मातेने आता तीन मुलींना आणि एका मुलाला जन्म दिला आहे. … Read more

लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीने मैदानात नव्हे तर आता मैदानाबाहेर सर्वांनीच कौतुक करावं अशी कामगिरी केली आहे. तिने एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे अनेक निष्पाप जीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमासाठी ज्वाला गुट्टाने मागील चार महिन्यांपासून अनेकवळा सरकारी रुग्णालयाच्या चकरा मारल्या आणि जवळपास 30 लिटर ब्रेस्ट मिल्क … Read more

Mahabaleshwar News – माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून आपल्या गावी निघालेल्या पती पत्नीवर माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (50) हे पत्नीसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास … Read more

Rubber Test Championship 2025 चा पहिला शतकवीर ठरलाय विनायक भोईर, पालघर मजबूत स्थितीत

RUBBER TEST CHAMPIONSHIP 2025 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना चंदन 11 रायगडविरुद्ध ताई पॅकर्स पालघर या संघांमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पालघरच्या विनायक भोईरने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत शतक ठोकले आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रायगडच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या होत्या. टेनिस क्रिकेटच्या बातम्यांसाठी … Read more

Wai News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025; वयगांवसह सातारा जिल्ह्यातील 12 गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील अनेक गावांनी हिरहिरीने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. अखेर 11 तालुक्यांमधील 12 गावं या उपक्रमात बाजी मारण्यात यशस्वी ठरली. या सर्व गावांचा सत्कार सोहळा पालकमंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी … Read more

Bank Of Maharashtra Job – ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये सुरू झालीय विविध पदांची भरती, वाचा सविस्तर…

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये (Bank Of Maharashtra Job) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिष्ठित बँकेत काम करून आपल्या करिअरच्या कक्षा उंचावण्याची संधी उमेदवारांना आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला आपल्या कामकाजाचा विस्तार आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक बळकट करायची आहे. यासाठी ‘रिक्रूटमेंट प्रोजेक्ट 2025-26 फेज II’ अंतर्गत विशेष अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली … Read more

Satara News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव; वयगांवकरांच्या एकीचा विजय, वाई तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी, आज सत्कार होणार

वयगांव गावाने ‘पर्यावरणपूरक Ganeshotsav 2025’ या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत वाई तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आज (11 सप्टेंबर 2025) वयगांव गावासह सातारा (Satara News) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या गावांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 12 गावांची निवड करण्यात … Read more

Video – डॉक्टर नव्हे देवदूतच; Heart Attack आला आणि…; 22 सेकंदाचा थरार CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद

हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वेगाने वाढली आहे. अशा अनेक घटना CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद झाल्या आहेत. मैदानावर खेळाताना, मंचावर भाषण करताना, जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर व्हिडीओ पाहिले असतील. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

PM Vidyalaxmi Scheme – उच्च शिक्षणासाठी सरकार देणार कर्जावर व्याज सवलत, टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी

श्रीमंत असो अथवा गरीब शिक्षण हे सर्वांसाठीच गरेजचं आहे. शिक्षणाच्या जोरावर गरिबीच्या चिखलातून श्रीमंतीच्या सोफ्यावर बसण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने आहे. योग्य शिक्षण घेतल्यामुळे अनेकांनी आपल्या गरिबीवर मात केल्याची अनेक उदाहरणे तुम्ही सुद्धा पाहिली असतील. श्रीमंताच्या घरात जन्मलेल्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक चणचण अजिबात भासत नाही. पैशांच्या जोरावर पाहिजे त्या ठिकाणी आणि … Read more

IND Vs UAE – संजू आणि रिंकूच्या निवडीवर टांगती तलवार; UAE विरुद्ध या खेळाडूंसह मैदानात उतरेल भारताचा संघ!

Asia Cup 2025 चा धमाका सुरू झाला आहे. पहिल्यात सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगला धुळ चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तर आज टीम इंडियाचा पहिला सामना UAE विरुद्ध (IND Vs UAE) होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. दुबई च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता … Read more

error: Content is protected !!