International Men’s Day – अरे रडायला तू काही मुलगी आहेस का… समाजाने दाबलेली पुरुषांची एक अबोल वेदना

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर अरे काय रडतोस… पुरुषासारखा पुरुष ना तू, रडतोय काय… मुलांनी रडायचं नसतं… रडायला तू काही मुलगी आहेस का?… ही वाक्य प्रत्येक पुरुषाच्या मनात एखाद्या धारधार तलवारीसारखी हृदयातून आरपार गेली आहेत. ही मानसिक जखम म्हणजे पुरुषाचं पुरुषत्व, ही समाजाने पुरुषाला दिलेली अबोल ओळख आहे. परुष रडला तर त्याच्यावर टोमण्यांच्या रुपात वाक्यांचे … Read more

Wai Municipal Council Election – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ, पाहा Photo

वाई (Wai Municipal Council Election) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ गंगापूर येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या पवित्र दर्शनाने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

Wai News – जेव्हा सरपंच स्वत: गांडूळ खत बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात, हा Video पाहाच

उपक्रमशील गाव म्हणून सध्या वाई (Wai News) तालुक्यात वयगांव गावाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. याच उपक्रमात आणखी एका उपक्रमाची भर पडली. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार यांनी गांडूळ खत (Gandul Khat) बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तसेच गांडूळ खताच्या फायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे ड्रम रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ग्रामपंचायत वयगांवला देण्यात … Read more

IND Vs SA Test – सायमन हार्मरचा टीम इंडियाला दणका! सामना फिरवला आणि दक्षिण आफ्रिका 30 धावांनी विजयी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. प्रथम टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी केली, तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही त्याच तोडीची गोलंदाजी करत यजमानांची दाणादाण उडवली. दोन्ही संघांना एकाही डावात 200 चा आकडा पार करता आला नाही. लो स्कोरींग झालेल्या या यामन्यात अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी … Read more

Video – बुम बुम बुमराह… असा काही चेंडू टाकला की फलंदाजही अवाक् झाला

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या सामन्याचा तिसरा दिवस सुरू असून दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 189 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 153 धावा केल्या त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 7 षटकांचा … Read more

Moroshicha Bhairavgad – धडधड धडधड… रॅपलिंगचा थरार अन् महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात अवघड दुर्ग आम्ही सर केला

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर धडधड धडधड… जेव्हा गड चढायला सुरुवात केली तेव्हा आमच्या हृदयाची अवस्था अशीच झाली होती. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. गड चढायला अवघड होता. एक चूक आणि थेट गडावरून खाली, अशा प्रकारची गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्यांची रचना होती. परंतू मनातून पूर्ण निश्चय केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होता … Read more

Wai News – वाई आगारातील चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स केली परत

प्रवास करत असताना अनावधानाने बऱ्याच वेळा आपल्या मौल्यवान वस्तू या गाडीमध्येच राहतात. अशा परिस्थितीत आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. परंतू संबंधीत गाडीचे चालक आणि वाहक जर प्रामाणिक असतील, तर वस्तू कितीही मौल्यवान असो ती हरवण्याचा धोका अजिबात राहत नाही. याचाच प्रत्यय पारगाव-खंडाळा येथील भोसले कुटुंबाला आला आहे. एसटी बसमध्ये दागिने, मोबाईल … Read more

High Court News – खड्ड्यांमुळे अपघात किंवा मृत्यू, 50 हजार ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार! उच्च न्यायालय

चांगल्या आणि खड्डेमुक्त रस्त्यांनी प्रवास करायला सर्वांनाच आवडतं. तसेच तो प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क सुद्धा आहे. परंतू सध्याच्या घडीला नागरिकांच्या मुलभूत अधिकारचं धोक्यात आला आहे. भारतामध्ये दररोज अनेक नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू होत आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. खड्ड्यामुळे अपघात झालेल्या पीडितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले … Read more

Wai News – वयगांवकरांच्या एकीचे बळ; मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून बंधाऱ्याचे बांधकाम, पाहा Photo

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे. (फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव) सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी … Read more

IND Vs SA First Test – 13 वर्षांनी पुनरावृत्ती! शुभमन गिलनेही तेच केलं जे महेंद्र सिंग धोनीने केलं होतं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमानांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ही मालिका World Test Championship 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने … Read more

error: Content is protected !!