Panchayat Samiti Election Wai – अर्ज भरताना घोळ झाला अन् अभेपूरीसह बावधन गणातून दोघांची विकेट पडली

वाई तालुक्यात पंचायत समिती (Panchayat Samiti Election Wai) व जिल्हा परिषदेसाठी जवळपास 81 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये पंचायत समितीसाठी 45 आणि जिल्हा परिषदेसाठी 36 अर्जांचा समावेश आहे. 27 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. तत्पूर्वी अर्ज छाननी प्रक्रिया करण्यात आली असून दोन उमेदवारांचा पत्ता निवडणुकीपूर्वीच कट झाला आहे. सुचकांच्या घोळामुळे दोन्ही उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.

वाई तालुक्यात पंचायत समितीसाठी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले दीपक काकडे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये सूचकाच्या जागी सही केली, यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला असून बाद झाला आहे. असाच काहीसा प्रकार बावधन गणातील अजय पिसाळ यांच्यासोबत झाला. अजय पिसाळ यांनी अर्जावर सूचकाची सहीच केली नाही त्यामुळे त्यांनाही निवडणुकीच्या मैदानातून माघारा घ्यावी लागणार आहे. दरम्यान, अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली असून 79 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अजूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत कायम आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!