Panchgani News – छत्री निशाणी हाती घेऊन युवा नेतृत्व गणेश कासुर्डे मैदानात; विकासासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा

पाचगणीतील (Panchgani News) स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व म्हणून गणेश कासुर्डे छत्री निशाणी घेऊन मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. प्रामाणिक कार्यपद्धती, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि सर्वसमावेशक विचारसरणी यांच्या बळावर कासुर्डे यांनी मतदारांची दारोदारी भेट घेत संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पाणीपुरवठा, रस्ते-विकास, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा आणि युवांसाठी प्रगत संधी हे विषय कासुर्डेंच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहेत. युवा उमेदवार म्हणून नव्या ऊर्जा आणि सकारात्मक बदलाची अपेक्षा बाळगणारा नागरिक वर्ग त्यांच्याभोवती एकवटताना दिसत आहे.

प्रचाराच्या प्रारंभीपासूनच नागरिकांचे वाढते सहकार्य, संवादात मिळणारी सकारात्मक प्रतिक्रिया आणि विविध प्रभागातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कासुर्डेंची उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचे पहायला मिळते. “विकासासाठी साथ द्या” या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून छत्री निशाणी स्थानिक पातळीवर आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

एकूणच, युवा नेतृत्वाची दमदार एंट्री आणि विकासाधारित अजेंडा यांच्या बळावर गणेश कासुर्डे निवडणूक रिंगणात लक्षवेधी ठरत आहेत.

error: Content is protected !!