Pandharpur Wari 2025 – देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला…, हरिनामाच्या गजरात पंढरपूर झाले तल्लीन

Pandharpur Wari 2025

रुपी जडले लोचन | पायी स्थिरावले मन ||

देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला ||

कळो नये सुखदुःख | तहान हरपली भूक ||

तुका म्हणे नव्हे परती | तुझ्या दर्शन मागुती ||  

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ म्हणजे, माझे डोळे तुमच्या रुपाच्या ठिकाणी गढून गेले आहेत. तुमच्या चरणी माझे मन स्थिरावले आहे. हे विदुना तुला पाहाण्याने माझा देहात्मभाव नाहीसा झाला, तुझ्या बनाने मुखदुःखाचे भान नाहीसे झाले, व्यानि झाल्याने प्रपंच परीवर्तन झाले. आता पुन्हा प्रपंचात पडणार नाही. 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा महासागर लोटला आहे. हरि नामाच्या गजरात पंढरपूर तल्लीन झालं आहे.