सोशल मीडिया म्हणजे विविध ट्रेंडचा सुळसुळाट. कधी कोणता व्हिडीओ, फोटो किंवा एखादा ट्रेंड व्हायरल होईल याचा भरवसा नाही. दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ अपलोड होतात. यातल्याच एखाद्या व्हिडीओचा ट्रेंड तयार होतो आणि सर्वजण लाईक आणि फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात ट्रेंड फॉलो करतात. असाच एक मासिक पाळीचं (Period Blood Trend) रक्त चेहऱ्याला लावण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मासिक पाळीचं रक्त चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो, असा दावा या ट्रेंडच्या माध्यमातून केला जात आहे.
हा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी मासिक पाळीच्या रक्तात काय असतं हे जाणून घ्या
- रक्त – गर्भाशयाच्या अस्तरातून बाहेर पडणारे सामान्य रक्त (Red Blood Cells, White Blood Cells)
- एंडोमेट्रियल ऊतक (Uterine lining) – गर्भाशयातील जाड झालेले अस्तर
- सर्व्हिकल म्युकस – गर्भाशयाच्या मुखातून येणारा चिकट स्त्राव
- योनीतील नैसर्गिक स्त्राव – व्हॅजायनाचे नैसर्गिक फ्लुइड
- बॅक्टेरिया – शरीरातील नैसर्गिक फ्लोरा
- प्लाझ्मा – रक्तातील पाण्यासारखा घटक
या सर्व गोष्टी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, मासिक पाळीचं रक्त थेट चेहऱ्याला लावणं धोकादायक आहे. यामुळे चेहऱ्यावर संसर्ग, सूज येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
ट्रेंड काय सुरू आहे?
बऱ्याच देशांमध्ये टिकटॉकपासून या ट्रेंडची सुरुवात झाली आहे. #periodfacemask आणि #menstrualmasking या हॅशटॅगच्या मदतीने अनेक जण व्हिडीओ अपलोड करत आहेत. व्हिडीओमध्ये अनेक लोकं मासिक पाळीचे रक्त चेहऱ्याला लावून चेहरा धुवत आहेत आणि चेहरा नैसर्गिकपणे ग्लो करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, त्वचा तज्ञांनी या ट्रेंडला धोकादायक मानलं आहे. मासिक पाळीच्या रक्तामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक रित्या ग्लो येतो, असे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही.
जागतिक आरोग्य संस्थांनी दिला सावध राहण्याचा इशारा
जागतीक आरोग्य संघटना (WHO), UKHSA, CDC या आरोग्य संस्थांनी नागरिकांना अलर्ट केलं असून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.