Navi Mumbai News – महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्रच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; ३० उद्योजिकांचा सन्मान

नवी मुंबईतील (Navi Mumbai News) महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ऐरोली येथील संत सावता माळी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास विविध परिसरातील सुमारे २५० महिला आणि संस्थेचे ६२ कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई महानगरपालिकाच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सचिव सौ. उज्वला सुरेश वाडकर, समाजसेविका प्रतीक्षा हुंडारे, प्रियांका पाटील तसेच रबाळे पोलीस ठाणे येथील अधिकारी लक्ष्मी सपकाळे आणि कविता वाडीवाले उपस्थित होत्या. महापौरांनी महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करत शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रगती करण्याचे आवाहन केले. तसेच नवी मुंबई परिवहनमध्ये ४०० महिला वाहनचालकांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० उद्योजिका महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षण आणि कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुवर्णतुला दिवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तेजश्री सोनटके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!