Ganeshotsav 2025 – प्रभू श्री राम ते आदमापूरातले बाळूमामा, कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; पाहा एका क्लिकवर

गणेशोत्सवाला आता अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे रविवारी (17 ऑगस्ट 2025) मुंबईतील लालबाग, परळ आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गणरायांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा ओसंडून वाहणाऱ्या जल्लोषाने सर्व परिसर दणाणून गेला होता. जवळपास 60 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सवात भक्तांना विविध रुपांमध्ये गणरायाच दर्शन घेता येणार आहे. आदमापूरातील बाळूमामा, प्रभू श्री रामांच्या अवतारातील बाप्पा आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांसारखा दिसणारा चिंचपोकळीचा चिंतामणी असे अनेक गणपती मुंबईकरांना पाहता येणार आहेत.

(फोटो सौजन्य – सलोनी मोरे आणि ओमकार वाडकर)

चिंचपोकळीचा चिंतामणी
परळचा राजा
कोपरखैरणेचा महागणपती
चिंचपोकळीचा चिंतामणी