आकाशात उडणारं विमान पाहून अनेकांना विमानात बसण्याचा मोह झाला असेल. बऱ्याच जणांनी विमानात बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले असेल. मात्र, आजही कित्येक भारतीयांचे एकदा तरी विमानात बसण्याचे स्वप्न आहे. लहान असताना यात्रांमध्ये दिसणारं प्लॅस्टिकच विमान पाहून ‘आई मला सुद्धा विमान पाहिजे’ असा हट्ट अनेकांनी केला असेल. तेव्हा आपला हट्ट पुरवला जायचा. परंतु जसजस वय वाढत गेलं तसतस विमानात बसण्याचं बऱ्याच जणांच स्वप्न मागे पडत गेलं. विमानात बसण्यापेक्षा विमान उडवण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?, तर याचं उत्तर कदाचित नाही अस असेल.
शिक्षणाचा अभाव, गरीब परिस्थिती आणि मार्गदर्शनाची कमतरता या सर्व गोष्टींमुळे सामान्य घरातील व्यक्ती वैमानिक झाल्याची उदाहरणं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आहेत. त्याच अनुषंगाने ही अपुऱ्या मार्गदर्शनाची दरी दूर करण्यासाठी ‘वैमानिक मी होणार’ (Pilot Course) हा ब्लॉग लिहण्यात येत आहे. या ब्लॉगमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
How to Become a Pilot in India
भारतात किंवा जगातील कोणत्याही देशामध्ये पायलट होण्यासाठी तुमच्या अंगी काही कलागुण असणं गरजेचे आहे. निर्भीड, कठीण प्रसंगात अचूक निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या अंगी असली पाहिजे. त्याच बरोबर काही शैक्षणिक अटी तुम्ही पुर्ण केलेल्या असल्या पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही इयत्ता 12 वी भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. बारावी फक्त उत्तीर्ण केली म्हणजे आपलं काम झालं, असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. कारण तुम्हाला बारावी कंपल्सरी 50 टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. तरच तुमचा वैमानिक होण्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
पायलट होण्यासाठी वयाच्या काही टप्प्यांवर तुम्हाला पायलट परवाना मिळवणे गरजेचे आहे. या टप्प्यातील सर्वात पहिला परवाना म्हणजे Student Pilot License (SPL) होय. हा परवाना प्राप्त करण्यासाठी तुमचे वय 16 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांमध्ये Commercial Pilot License (CPL) हा परवाना तुम्हाला वयाची 18 वर्ष पूर्ण होण्या अगोदर प्राप्त करावा लागणार आहे.
शैक्षणिक अटी पूर्ण केल्यानंतर काही वैद्यकीय अटींची पुर्तता करणं सुद्धा गरजेचे आहे. विमान उडवणे हे एक कौशल्यपूर्ण काम आहे. त्यासाठी संबंधित वैमानिक आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. विमान उडवण्यासाठी कोणकोणत्या परवान्यांची आवश्यकता असते, त्याची नावं आपण पाहिली. हे परवाने मिळवायचे कसे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर, वैमानिक होण्यासाठी तुम्हाला Directorate General Of Civil Aviation (DGCA) मंजूर वैद्यकीय केंद्रातून वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असणार आहे. उड्ढान प्रशिक्षण सुरू करण्यासाठी तुम्हाला वर्ग 2 ची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर व्यावसायिक पायलट परवाना मिळवण्यासाठी वर्ग 1 चे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्हाला सर्वप्रथम SPL हा परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला DGCA मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन परीक्षा पास करावी लागणार आहे. तसेच यामध्ये तुमच्या आरोग्याचे मुल्यांकनासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण करून घेतल्या जातात.
Student Pilot License (SPL) चा परवाना प्राप्त केल्यानंतर Commercial Pilot License (CPL) हा परवाना मिळवण्यासाठी उमेदवारांच्या हालचाली सुरू होतात. यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी आवश्यक असणारी सर्वात पहिली अट म्हणजे क्रॉस-कंट्री आणि नाईट फ्लाइंगसह किमान 200 तासांचे उड्डाण चाचणी तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करावी लागणार आहे. त्याच बरोबर हवामानशास्त्र, हवेत विमान उडवत असतानाचे नियम, विमानाचे तांत्रिक ज्ञान, नेव्हीगेशनसह तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. व्यावसायिक वैमानिक होण्याची पूर्व अट म्हणजे तुमच्या कडे SPL चा परवाना असला पाहिजे. जर तुमच्याकडे SPL परवाना नसेल, तर तुम्ही थेट CPL परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणार्या पात्रता नियमांमध्ये बसू शकणार नाही. या सर्व अटींची पूर्णता केल्यानंतर निवड चाचणी, मुलाखतीसह नोकरीची प्रक्रिया सुरू होते. सर्व विमान कंपन्यांच्या निवड प्रक्रियेचे निकष वेगवेगळे असतात.
पायलट होण्यासाठी प्रवेश परीक्षा | how to become a pilot after 12th
भारतामध्ये पायलट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्हाला फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागणार, संबंधित परवाने मिळवावे लागणार. त्यासाठी तुम्हाला काही प्रवेश परीक्षा आणि काही गरजेच्या चाचण्या उत्तीर्ण कराव्या लागणार आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने पायलट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही प्रवेश परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
1. IGRUA प्रवेश परीक्षा
भारतातील सर्वात प्रतिष्ठित एव्हिएशन अकादमी म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय उरण अकादमी (IGRUA) यांच्या माध्यमातून या परीक्षेचे आयोजन केले जाते. या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याने इयत्ता बारावी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. SC/ST/OBC या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना हीच 45 टक्के इतकी असणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धीतने घेतली जाईल. त्याच बरोबर परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्कावर आधारीत प्रश्नांचा समावेश असणार आहे. सर्व टप्पे पार केल्यानंतर एका पॅनलमार्फत विद्यार्थ्याचे मुलाखत घेतली जाईल. तसेच DGCA मार्फत वर्ग 1 वर्ग 2 वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
2. Cadet Pilot Programs by Airlines
इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या अनेक भारतीय विमान कंपन्या, फ्लाइट ट्रेनिंग अकादमींच्या सहभागीदारीत कॅडेट पायलट प्रोग्राम ऑफर करतात. यासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण करावी लागणा आहे. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. यासाठी एअरलाइन प्रतिनिधींचा वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. मात्र, गट चर्चेला विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच DGCA मार्फत वर्ग 1 वर्ग 2 वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
3. राजस्थान राज्य फ्लाइंग स्कूल प्रवेश परीक्षा
भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50% गुणांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी. लेखी परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि सामान्य इंग्रजी या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच DGCA मार्फत वर्ग 1 वर्ग 2 वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
4. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT)
भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांसाठी या विशेष प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. या प्रवेश परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. त्याच बरोबर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असून परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, Verbal Ability in English, Reasoning And Military Aptitude यावर आधारित प्रश्न विचारले जातात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर Air Force Selection Board (AFSB) यांच्या माध्यमातून मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमध्ये विविध चाचण्या घेतल्या जातात. जसे की मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुप काम, वैयक्तिक मुलाखत आणि बुद्धिमत्ता रेटिंग या चाचण्यांचा समावेश असतो. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही कठोर वैद्यकीय फिटनेस मानके पूर्ण करावी लागतात. कारण ही परीक्षेच्या माध्यमातून भारतातीय हवाई दलातील वैमानिकांची निवड केली जाते.
5. खाजगी महाविद्यालयांद्वारे प्रवेश परीक्षा
CAE Oxford Aviation Academy किंवा Bombay Flying Club सारख्या अनेक खाजगी उड्डाण शाळा, विद्यार्थी वैमानिकांसाठी त्यांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात. या प्रवेश परीक्षांमध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. DGCA मार्फत वर्ग 1 वर्ग 2 वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लेखी परीक्षांव्यतिरिक्त, अनेक प्रवेश परीक्षा आणि एअरलाइन कॅडेट प्रोग्राम्समध्ये मानसशास्त्रीय आणि सायकोमेट्रिक चाचण्यांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने सायकोमोटर कौशल्य, संज्ञात्मक क्षमता चाचणी, WOMBAT चाचणी कौशल्यपूर्ण चाचण्यांचा समावेश आहे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कोणत्या पदांवर काम करण्याची संधी मिळते?
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा चालू असताना वैमानिक म्हणून तुमच्या हवाई सफरीची सुरुवात झालेली असते. क्षेत्र कोणतेही असो अनुभवानुसार पदानुक्रम ठरवला जातो. त्यानुसार, पायलट होण्यासाठी सुद्धा काही पदानुक्रम आहेत. जसे की, Student Pilot, Private Pilot, Commercial Pilot, First Officer/Co-pilot, Senior First officer, Captain, Training Captain/Instructor, Check Pilot/Check Airman, Charter or Corporate pilot, Cargo Pilot, Agricultural Pilot, Helicopter Pilot या पदांचा समावेश आहे.
भारतातील या कंपन्या विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत
ज्या विद्यार्थ्यांकडे Commercial Pilot License आहे. अशा विद्यार्थ्याच्या शोधात भारतातील टॉपच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने Indigo, SpiceJet, Air India, Vistara, GoAir, AirAsia India, Alliance Air, Jet Airways, Blue Dart Aviation, Pawan Hans, Indian Air Force (IAF) And Government Aviation Departments, Tata group Aviation Wings (Private And Charter Operations), Regional Airlines And Charter Services इ. सरकारी आणि खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा
-
Animation; करिअरचा एक उत्तम पर्याय
-
मर्चंट नेव्ही म्हणजे इंडियन नेव्ही? / Merchant Navy Information In Marathi
-
लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.