पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव होता, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव होता. शुभ मुहूर्तावर पार पडलेला हा विधी आपल्या सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेतील एका नवीन अध्यायाचा शुभारंभ करतो. राम मंदिराचा गौरवशाली ध्वज विकसित भारताच्या पुनर्जागरणाचा पाया आहे. हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक असू दे, हा ध्वज सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक असू दे आणि हा ध्वज सदैव याच स्वरूपात फडकत राहो, विकसित भारताची ऊर्जा बनो… हीच माझी भगवान श्री रामांना इच्छा आहे. जय जय सियाराम, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 

error: Content is protected !!