Rabi Crop Competition – रब्बी हंगाम पिकस्पर्धेचा धमाका, पाच पिकांसाठी होणार द्वंद्व; वाचा सविस्तर…

शेतकरी राजाने आधुनिकतेची वाट धरून आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात असे अनेक शेतकरी आहे, ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपली शेती फुलवली आहे. परंतू अशा शेतकऱ्यांची संख्या अजूनही खूप कमी आहे. शेतकऱ्यांना प्रोत्सोहान मिळायला पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करता यायला हवा आणि शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये केले पाहिजेत. या अनुषंगाने रब्बी हंगाम 2025 मध्ये राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना (Rabi Crop Competition) राबवण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025 मध्ये ही पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्रता काय आहेत. अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. कोणत्या पिकांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणती पात्रता असणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्यांची स्वत: च्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • स्पर्धेत भाग घेणारा शेतकरी स्वत: जमीन कसत असणे आवश्यक आहे.
  • एका वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येऊ शकतो.
  • स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात किमान 40 R क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  • जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
  • विहित ननुन्यातील अर्ज (प्रपत्र – अ)
  • 7/12, 8-अ चा उतारा
  • प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
  • 7/12 वर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक
  • बँकेचा चेक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

या स्पर्धेत विजेत्यांना पुढील प्रमाणे पारितोषिक मिळणार

राज्यपातळीवर

  1. पहिला क्रमांक – 50,000 रु.
  2. दुसरा क्रमांक – 40,000 रु.
  3. तिसरा क्रमांक – 30,000 रु.

जिल्हा पातळीवर

  1. पहिला क्रमांक – 10,000 रु.
  2. दुसरा क्रमांक – 7,000 रु.
  3. तिसरा क्रमांक – 5,000 रु.

तालुका पातळीवर

  1. पहिला क्रमांक – 5,000 रु.
  2. दुसरा क्रमांक – 3,000 रु.
  3. तिसरा क्रमांक – 2,000 रु.

या पिकस्पर्धेसाठी शुल्क किती आकारले जाणार आहे

या पिकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 300 रुपये आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

कोणकोणत्या पिकांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे.

  • ज्वारी
  • गहू
  • हरभरा
  • करडई
  • जवस

स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन अर्ज करायचे आहेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. तसेच पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a comment

error: Content is protected !!