रेल्वे विभागात तब्बल 8 हजार 868 जागांची बंपर भरती (Railway Job Vacancy) करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्या बेरोजगार तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात तुम्हालाही कुठेही पोस्टींग मिळू शकते, त्यामुळे नोकरी सोबत तुम्हाला भारतातील विविध शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहण्याची तिथली संस्कृती परंपरा जाणून घेण्याची संधी सुद्धा या निमित्ताने निर्माण झाली आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षापर्यंत असले पाहिजे.
कोणकोणती पदे भरली जाणार
| पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
| चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 161 | पदवीधर |
| स्टेशन मास्टर | 615 | पदवीधर |
| गुड्स ट्रेन मॅनेजर | 3416 | पदवीधर |
| ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 921 | पदवीधर व इंग्रजी हिंदीत टायपिग |
| सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 638 | पदवीधर व इंग्रजी हिंदीत टायपिग |
बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी जागा
| पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
| कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 2424 | 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण |
| अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | 354 | 50 टक्के बारावी उत्तीर्ण, इंग्रजी-हिंदीत टायपिंग |
| ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | 163 | 50 टक्के बारावी उत्तीर्ण, इंग्रजी-हिंदीत टायपिंग |
| ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 77 | 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण |
- पदवीधर उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2025
- बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2025
लोको पायलट कसे व्हावे / How To Become a Loco Pilot information in Marathi
फी किती भरावी लागणार
- पात्र उमेदवारांना अर्जासोबत जनरल, ओबीसी, आर्थिक मागास वर्गासाठी 500 रुपये फी
- एससी, एसटी, ईबीसी, ट्रान्सजेंडर, महिला वर्गांसाठी 250 रुपये फी
- एससी, एसटीतील वर्गांना वयामध्ये 5 वर्षे सूट, तर ओबीसी वर्गांतील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे.
रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल. – https://www.rrbmumbai.gov.in/