Satara Crime बलात्कार, विनयभंग आणि अत्याचार हे शब्द गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार तुमच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात येत असतील. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होतच आहेत. कराडमध्ये सुद्धा अशीच घटना घडली असून नराधमाने साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्हा हादरून गेला आहे. खेळण्यासाठी म्हणून मुलगी बाहेर गेली आणि घात झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अशून, संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीची आई शेजारी जेवणाची मदत करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची साडेचार वर्षांची मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत होती. आई स्वयंपाक बनविण्यात व्यस्त होती. त्यामुळे ही लहान मुलगी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेली. याच संधीच्या शोधात असलेल्या नराधमाने मुलगीला त्याच्या घरी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर मुलगीच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सकाळने या संदर्भात वृत्त दिले आहे.