खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘Boricha Bar’ ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा जल्लोषात साजरी करण्यात आली. तालुक्यातील बोरी व सुखेड या दोन गावांतील महिलांनी मोठ्या संख्येने यासाठी सहभाग घेतला होता. ओढ्याकाठी येऊन हातवारे करत दोन्ही गावातील महिला एकमेकींना मनोसक्त शिव्या देतात, झिम्मा खेळतात, फुगडी खेळतात आणि पारंपरिक गाणी सादर करत अगदी उत्साहात ‘बोरीचा बार’ साजरा करतात.
मंगळवारी (29 जुलै 2025) संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खंडाळा तालुक्यात सुद्धा नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरी आणि सुखेड या गावातील ‘बोरीचा बार’ अगदी उत्साहात आणि एकमेकांना शिव्या घालत साजरा करण्यात आला. दोन्ही गावातील महिला बार घालण्यासाठी ओढ्याकाढी जमा झाल्या होत्या. अगदी नटून थटून सर्व महिला अगदी जोशात एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत होत्या. महिलांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. तसेच ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.
या अनोख्या पंरपरे मागे काय इतिहास आहे?
बोरी गावचा पाटील होता त्याच्या दोन बायका आहे. पाटलाची एक बायको बोरी गावात आणि दुसरी बायको सुखेड गावात राहत होती. एक दिवशी दोघी ओढ्यात कपडे धुवायला आल्या असता त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दोघी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या. नागपंचमीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. त्यामुळे तेव्हापासून बोरीचा बार साजरा केला जातो. अशी अख्यायिका सांगितली जाते.
View this post on Instagram