सातारा (Satara News) जिल्ह्यामधील दिव्यांग बालकांसाठी मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा निधी सेवा प्राधिकरण आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालाय यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड काढणे, आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड काढणे, हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे. जिल्हा माहिती कार्यायलाच्या अधिकृत फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करून याची माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारी शिबिरास सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. शिबिराच्या दिवशी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग बालकांना किंवा त्यांच्या पालकांना दिव्यांग प्रमाणपत्र काढावयाचे आहे, त्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनच सदर शिबिरास हजर रहावे. याचबरोबर दिव्यांग बालकांचे आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्त दिव्यांग बालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा तर्फे करण्यात आलं आहे.
शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क कुठे साधणार
कार्यालयाचा पत्ता – जिल्हा न्यायालय, सातारा इमारतीच्या पाठीमागे, ५१५, सदर बझार, सातारा, संपर्क क्र. ८५९१९०३६११.