Satara News – पाऊले चालती मंत्रालयाची वाट… लाडक्या बहिणींचा नीरा नदी पुलावर दंडवत; कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थ आक्रमक

गावकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने सुरू असलेले खान क्रशर बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी सातारा (Satara News) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेकायदेशीर क्रशरचा परवाना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरूच राहणारा असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गेले तीन दिवस झाले ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना नीरा नदीच्या पुलावर दंडवत घालत आंदोलन करण्यात आलं. 

‘पाऊले चालती मंत्रालयाची वाट, खडी क्रशरची लावाया वाट’, अशा पद्धतीचे बॅनर झळकावत प्रशासनाच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या माध्यमातून केला जात आहे. कुसगांवमध्ये बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला स्टोन क्रेशर बंद करण्यात यावा ही मुख्य मागणी ग्रामस्थांची आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि ग्रामस्थांचा मुंबईच्या दिशेने निघालेला लाँग मार्च रोखण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाले मेटकरी यांनी शनिवारी (19 जुलै 2025) आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. परंतु यावेळी तोडगा निघाला नाही. ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आणि जोपर्यंत दगडखाणा व क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही लाँग मार्च थांबवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्याचबरोबर ब्लास्टिंग उत्खनन व वाहतूक थांबवण्याचे कोणतेही लेखी अश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Coach PRAVIN (@pravin.vare.5)

Satara News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांच आंदोलन; खडी क्रशरमुळे निसर्गाची हानी कशी होते? समजून घ्या…