सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातला एकतरी व्यक्ती देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर कार्यरत आहे. सातारा जिल्हा आणि देशसेवा हे एक अतूट नात आहे. अशीच देशसेवा बजावत असताना कोरेगाव तालुक्यातील हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे (40) यांना चीनच्या सीमारेषेजवळ कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या जवान प्रवीण वायदंडे यांना वीरमरण आल्याने सासुर्वे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रवीण वायदंडे हे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमारेषेजवळ महार रेजिमेंट, 22 इन्फंट्री ब्रिगेडमध्ये कार्यरत होते. शनिवारी (16 ऑगस्ट 2025) सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना वीरमर आल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण वायदंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वृद्ध आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (17 ऑगस्ट) सासुर्वे येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.