Satara News – देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना लष्कराच्या जवानाने गंडा घातला, पावणे चार लाखांची फसवणूक; पोलि‍सांनी बेड्या ठोकल्या

फौजींचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा (Satara News) साऱ्या जगात नावलौकिक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी व्यक्ती देशाच्या सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहे किंवा सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. असचं देशसेवेचं स्वप्न दोन तरुणांनी उराशी बाळगलं होतं. भरतीची वय मर्यादा ओलांडण्याचे शेवटचे वर्ष असल्यामुळे क्लर्क पदावर भरती होण्यासाठी रितेश वे त्याचा भाऊ आयुष जाधव यांनी आरोपी प्रदीप काळेला (28) 3 लाख 70 हजार रुपये पाठवले होते. परंतु पैसे मिळाल्यानंतर आरोपीने उडवाउडीवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि नंतर फोन बंद केला. याप्रकरणी प्रदीव विठ्ठल काळे (28) याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप काळे हा आर्मीमध्ये जीएनआर गनर या पदावर कार्यरत होता. तसेच दोन महिन्यांपासून गैरहजर होता. त्याने रितेश नितीन जाधव आणि त्याचा भाऊ आयुष राजू जाधव यांना आर्मीमध्ये ए.एम.सी क्लर्क पदाची भरती चालू आहे तुमचे भरतीचे काम होईल, असे सांगून पैसे उकळले. भरतीच शेवटच वर्ष असल्यामुळे दोघांनीही RTGS द्वारे आरोपीला 3 लाख 70 हजार रुपये पाठवले होते. पैसे दिल्यावर मेडिकल करता फोन येईल, थोडे दिवस थांबा अशी उत्तरे दिली. त्यानंतर फोन बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे रितेश आणि आयुष यांच्या लक्षात आलं. आरोपी कोळे याने कराड येथील एका युवकाची नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याचे सुद्धा तपासात उघड झाले आहे. त्याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच आणखी काही युवकांना फसवले असल्याची शक्यता पोलिसांना आहे. सदर आरोपीला पुण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने प्रवीण काळे यांनी आणखी काही युवकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या युवक व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्ह्यातील आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.