Satara News – लिंक ओपन केली आणि जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला 8 लाखांचा फटका, तुमचंही बँक खातं रिकाम होऊ शकतं! काय काळजी घ्यावी

Satara News सर्व गोष्टी मोबाईलवर अगदी सहज मिळू लागल्या आहेत. पण त्याचबरोबर याच मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन फ्रॉडच प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. नोकरदार वर्गापासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत बरेचजण या जाळ्यात अडकले आहेतच. अशीच घटना आता जावळी तालुक्यात घडली असून मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यामुळे जावळीच्या गटशिक्षाधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 10 हजार 266 रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अनोळखी नंबरवरून एखादी लिंक आल्यास काय केलं पाहिजे?

1. लिंक लगेच उघडू नका

  • अनोळखी क्रमांक, ईमेल किंवा WhatsApp वर आलेली लिंक संशयास्पद असेल तर क्लिक करू नका.
  • ती सुरक्षित आहे का हे तपासल्याशिवाय उघडू नका.

2. URL नीट तपासा

  • खरे वेबसाईटचे नाव बघा.
  • उदा. https://www.sbi.co.in हे खरे आहे, पण https://sbi-bank-login.xyz हे खोटं असू शकतं.

3. OTP / पासवर्ड कधीही टाइप करू नका

लिंकवर जाऊन लॉगिन, ATM पिन, क्रेडिट कार्ड नंबर, OTP अशी माहिती मागत असेल तर ती 100% फसवणूक आहे.

4. मोबाईल/कंप्युटरवर सुरक्षा ठेवा

  • Antivirus किंवा security app वापरा.
  • मोबाईल/लॅपटॉप नेहमी अपडेटेड ठेवा.

5. शंका आल्यास Delete करा

  • लिंक डिलीट करा.
  • शक्य असल्यास त्या मेसेजला “Report spam” करा.

6. चुकून क्लिक केल्यास काय करावे?

लिंक उघडली पण काही टाइप केले नसेल तर फारसं नुकसान होत नाही.

पण काही माहिती भरली असेल तर

  • लगेच पासवर्ड बदला
  • बँक अकाऊंट/UPI वापरला असेल तर बँकेत कळवा
  • मोबाईलमध्ये व्हायरस स्कॅन करा

“ओळखीच्या व्यक्तीशिवाय आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.”