Satara News – साताऱ्याच्या पठ्ठ्याचा ‘सुवर्ण’भेद, साहिल जाधवने World University Games मध्ये पटकावला पहिला क्रमांक

World University Games मध्ये साताऱ्याच्या (Satara News) साहिल जाधवने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. साहिल जाधवच्या सुवर्णभेदामुळे भारताचा तिरंगा जागतीक स्तरावर अभिमानाने फडकला आहे. साहिलने अंतिम फेरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटला याचा 149-147 अशा फराकने फराभव केला आणि सुवर्णपदक पटकावलं. साताऱ्यातील करंडी हे त्याचं मुळ गाव असून साहिलने सुवर्णपदक जिंकल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.

साहिल जाधव हा साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून प्रवीण सावंत हे त्याचे प्रशिक्षक आहेत. साताऱ्यातील पाच खेळाडूंनी आतापर्यंत जागतिक स्तरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दृष्टी अॅकेडमीच्या ओजस देवतळे, आदिती स्वामी, प्रथमेश फुगे, मधुरा धामणगावकर आणि आता साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. साहिलने केलेल्या कामगिरीचं खासदार उदयन राजेंनीही कौतुक केलं आहे.