Satara Rain Update – पाटणमध्ये NDRF च्या टीमने 11 माकडांना दिलं जीवदान; पाहा थरारक Video

सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने धुवांधार बॅटींग केली आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क सुटला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने याचा फटका नागरिकांसह वन्यप्राण्यांनासुद्धा बसला आहे. पाटण तालुक्यातील संगमनर धक्क्यावर 11 माकडे पुराच्या पाण्यात अडकली होती. यासाठी NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं होत.

पावासाने झोडपून काढल्यामुळे आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर परिसर जलमय झाला आहे. या भागातील नागरिकांना याचा फटका बसलाच पण त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा याचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात झाडावर सहा माकड आणि त्यांची पिल्लं अडकली होती. ही बाब लक्षात येताच वन विभागाने माकडांच्या सुटकेसाठी कराड येथील NDRF च्या पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ कराड येथून NDRF च्या पथकाने घटानस्थळी जात माकडांना रेस्क्यू केले आणि सुखरूप बाहेर आणलं.